अवघ्या 3 तासांत मुंबई-सिंधुदुर्ग हे अंतर पार करता येणार?

मुंबई ते सिंधुदुर्ग पट्ट्यात 'ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेसवे' प्रकल्प लवकरच सुरु होण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोव्यातून मुंबई गाठायची असेल तर आता जितका वेळ लागतो, त्यापेक्षा कमी वेळ भविष्यात लागेल, अशी तजवीज केली जातेय. कारण मुंबई ते सिंधुदुर्ग या पट्ट्यात एका नव्या एक्स्प्रेस महामार्गाचा प्रकल्प लवकरच सुरु होण्याची शक्यता वाढलीये. त्यामुळे पर्यायानं गोवा आणि मुंबई यामधील रस्ते मार्गानं लागणारा प्रवासाचा वेळही वाचण्याची शक्यताय. दिलासादायक बाब म्हणजे अवघ्या 3 तासांत मुंबई-सिंधुदुर्ग हे अंतर पार करता येईल, असा एक्स्प्रेस वे तयार करण्याचं नियोजन केलं जातंय.

हेही वाचाः गणेश चतुर्थीसाठी सरकारकडून मार्गदर्शक तत्वे ‌जारी

‘ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेसवे’

या नव्या महामार्गामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येईल, असं बोललं जातंय. महाराष्ट्र सरकारकडून मुंबई कोकण ईवेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेसवे असं त्याचं नाव आहे. या प्रकल्पासाठीचा सर्व्हे ड्रोनच्या माध्यमातून होणार आहे. 70 हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रोजेक्टसाठी अपेक्षित असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलंय.

ग्रीन फील्ड कोकण एक्स्प्रेसवे प्रकल्पाचा आता ड्रोन सर्व्हे होणार

दरम्यान, मुंबई – गोवा महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी ते रखडलेलं आहे. या कामाला अद्याप म्हणावा तसा वेग आलेला नाही. अशातच आता नव्या मार्गाची चाचपणी करण्यात येत आहे. या सागरी मार्गालगतच्या हायवेच्या कामाला वेग आलाय. या ग्रीन फील्ड कोकण एक्स्प्रेसवे प्रकल्पाचा आता ड्रोन सर्व्हे होणार आहे. MSRDCच्या माध्यमातून हा 400 किमीचा ग्रीनफिल्ड-कोकण कोस्टल एक्सप्रेसवेचं नियोजन करण्यात येत आहे. हा महामार्ग रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार आहे. या नव्या मार्गामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील ताण कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. इतकंच काय तर मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर केवळ तीन तासांत पार करता येणार आहे. अशा मुंबई कोकण एक्स्प्रेस वेचा प्रस्ताव आहे.

हेही वाचाः ऑनलाइन वेशभूषा स्पर्धेत अमेय शेटगांवकर पेडणे तालुक्यात प्रथम

70 हजार कोटींचा खर्च या प्रोजेक्टसाठी अपेक्षित

‘ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेस वे’ असं या नव्या प्रकल्पाचं प्रस्तावित नाव आहे. 70 हजार कोटींचा खर्च या प्रोजेक्टसाठी अपेक्षित आहे. तसेच 4 हजार हेक्टर जमिनीची यासाठी गरज लागणार आहे. उरणच्या चिर्ले गावातून सुरू होणारा हा प्रकल्प सिंधुदुर्गाच्या पत्रादेवीपर्यंत असणार आहे. तब्बल 400 किमीचा हा मार्ग आहे. सहा वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस महाराष्ट्र सरकारनं ठेवलाय. हा मार्ग झाल्यानंतर मुंबई ते सिंधुदुर्गाचा प्रवासाचा अर्धा वेळ वाचणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाकडे सिंधुदुर्गासोबत गोव्यातील लोकांचीही नजर लागली आहे. सिंधुदुर्ग ते मुंबई हे अंतर कमी झालं, तर गोव्यातील लोकांसाठीही हा मार्ग मुंबई गाठण्यासाठी फायदेशीर ठरेल, हे नक्की.

हा व्हिडिओ पहाः POLITICS| LOBO- पुन्हा एकदा मायकल लोबो राजकीय कृतीमुळे चर्चेत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!