‘त्याने’ चक्क घरातच उगवला गांजा; हायड्रोफोबिक मॉडेल पाहून पोलिसही आश्चर्यचकित

एमबीए असलेला पस्तीस वर्षीय जावेद रुस्तमपूरला ड्रग्जप्रकरणी अटक; बंगळुरु येथे कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

बंगळुरू: एमबीए असलेला पस्तीस वर्षीय जावेद रुस्तमपूर याला बंगळुरू क्राइम ब्रँचने घरात एलईडीच्या साहाय्याने गांजा उगवल्या प्रकरणी अटक केली आहे.

तीन वर्षांपूर्वी ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली

बेंगळुरू येथील कल्याणनगरमधून जावेदने आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण केलं आणि तो कम्मणहळ्ळी येथे राहत होता. तीन वर्षांपूर्वी त्याने ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. त्याचं वितरणही तो करू लागला.

ऑनलाइन पद्धतीने केला गांजाचा अभ्यास

त्याने ऑनलाइन पद्धतीने गांजाचा अभ्यास केला. त्याचं बियाणं मागवलं आणि आपल्या घरातूनच तो गांजा उगवू लागला. लॉकडाऊनच्या काळात त्याने हायड्रोफोबिक मॉडेल वापरून गांजाची लागवड केली. त्याचा हा अत्याधुनिक सेट अप पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!