मुकेश अंबानी यांच्याकडून आसाम पूरग्रस्तांसाठी २५ कोटी…

मुख्यमंत्री सरमा यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी आसाममधील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. रिलायन्स फाऊंडेशनने आसामच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये २५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. सोशल मीडियावर कृतज्ञता व्यक्त करताना आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, या कठीण प्रसंगी आसामच्या लोकांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांचे मनःपूर्वक आभार. हा निधी आमच्या मदतकार्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण सिद्ध होईल.
हेही वाचा:सभापतींनी त्वरित पोलिस तक्रार करुन मुख्यमंत्र्याची चौकशी करावी… ‍

गेल्या एक महिन्यांपासून पूरग्रस्तांना मदत

पुराच्या तडाख्याला तोंड देत असलेल्या आसाममध्ये रिलायन्स फाऊंडेशन गेल्या एक महिन्यापासून पूरग्रस्तांना मदत करत आहे. यासाठी रिलायन्स फाऊंडेशनची टीम आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय औषध विभाग, जिल्हा प्रशासन आणि इतर नागरी संस्थांसोबत काम करत आहेत.
हेही वाचा:पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांना प्रशिक्षण… ‍

पशुधन शिबिरांचे आयोजन

सर्वाधिक नुकसान झालेल्या कछार आणि नागाव जिल्ह्यांत अनेक ठिकाणी वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जात आहेत आणि आपत्कालीन मदत किटचे वाटप केले जात आहे. पशुधन शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. १ जून रोजी शिबिरे सुरू झाल्यापासून १,९००हून अधिक लोकांची तपासणी आणि उपचार करण्यात आले आहेत. पशुधन छावण्यांमध्ये १०,४०० हून अधिक वन्य प्राण्यांवर उपचार करण्यात आले आहेत.
हेही वाचा:जमीन हडप प्रकरणातल्या संशयिताला सशर्त जामीन… ‍

५,०००हून अधिक कुटुंबांना किट देण्यात आले

वैद्यकीय शिबिरांसोबतच, रिलायन्स फाऊंडेशन तात्काळ मदत  म्हणून आरोग्याच्या गरजांसाठी किट तसेच कोरडे रेशन किटचे वाटप करत आहे. आतापर्यंत ५,०००हून अधिक कुटुंबांना किट देण्यात आले आहेत. रिलायन्स फाउंडेशन कछार जिल्ह्यातील सिलचर, कालिन, बोरखोला आणि काटीगोर ब्लॉकमधील पीडितांना मदत करत आहे. त्याचबरोबर नागाव जिल्ह्यातील काथियाटोली, राहा, नागाव सदर आणि कामपूर ब्लॉकमध्येही मदतकार्य सुरू आहे.
हेही वाचा:बनावट विक्री कागदपत्रे करून फसवलं बँकेला… ‍

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!