Video | नाशकात मोठी दुर्घटना! आधी ऑक्सिजन टँकमधून गळती, नंतर 22 जणांच्या मृत्यूनं खळबळ

२२ जणांचा बळी गेल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नाशिक : कोरोनाच्या महामारीत एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. ठिकाण आहे, महाराष्ट्रातील नाशिक. नाशकातील एका रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन टँकमधून गळती झाल्याचं वृत्त सगळ्यात आधी समोर आलं. त्यानंतर आता २२ जणांना मृत्यू झाला असल्याची माहिती स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. पीटीआयनं याबाबतचं वृत्त दिलंय.

नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यात गॅस सर्वत्र पसरल्यानं एकच गोंधळ उडाला. दरम्यान, रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी 171 जण ऑक्सिजनवर असल्यातीही माहिती समोर येते आहे. तर, व्हेंटिलेटरवर अत्यवस्थ 67 रुग्ण असल्याचं कळतंय.

धक्कादायक!

टँक लीक झाल्यानंतर तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला होता. यादरम्यान 22 रुग्ण दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

झाकीर हुसेन रुग्णालयात 150 रुग्ण होते. यातील 23 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. याप्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी केली जाईल, असं आता तिथल्या आयुक्तांनी सांगितलंय. याप्रकरणाबाबत बोलताना सुरुवातीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजनची किरकोळ गळती झाली असून कोणाचाही मृत्यू झालं नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर या घटनेत अकरा रुग्णांचा मृत्यू झाल्याचं टीव्ही ९ मराठी वृत्त वाहिनीनं दिलं होतं. त्यामुळे नेमकं काय झालंय, यावरुन संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, या आकड्यामध्ये आता वाढ होत असल्याचं चित्र आहे. याप्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे.

दुष्काळात तेरावा

महाराष्ट्रात आधीच ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. त्यात ऑक्सिजनचा टँकर लिक झाला. त्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठाच विस्कळीत झाला. यात नाहक २२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. आणि चिंताजनक बाब म्हणजे मृतांचा आकडा अधिक वाढण्याचीही भीती आहे.

पाहा व्हिडीओ –

या घटनेनंतर तातडीनं राजकारणही सुरु झालं आहे. विरोध पक्षांनी या घटनेवरुन सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना तातडीनं ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान नितीन गडकरींनीही ट्वीट करत या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!