2000 रुपयांची नोट झाली गायब; सरकारकडून छापणं बंद

गेल्या दोन वर्षांत 2000 च्या नोटा छापल्या नसल्याची अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आता तुम्ही एटीएममधून पैसे काढायला गेलात तर तुम्हाला 2000 रुपयांची नोट मिळेल का? तुमच्यापैकी बहुतेकांचं उत्तर नाही असेल. 2000 रुपयांची नोट बंद केली गेली तर नाही ना, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जर तुमच्या मनात याविषयी काही शंका असेल, तर मग आम्ही तुम्हाला संपूर्ण तपशीलवार माहिती सांगणार आहोत. यापुढे 2000 रुपयांच्या नोटा छापणार नाहीत, असं सरकारने स्पष्ट केलं होतं. मार्च महिन्यात अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितलं होतं की, गेल्या दोन वर्षांत 2000 च्या नोटा छापल्या गेल्या नाहीत.

हेही वाचाः राज्य सरकारला केंद्राकडून मिळाली मदत; मुख्यमंत्र्यांची ट्विटद्वारे माहिती

3 अब्ज 36 कोटी 20 लाखांच्या नोटा चलनात

अनुरागसिंग ठाकूर यांच्या या निवेदनानुसार, 30 मार्च 2018 पर्यंत 3 अब्ज 36 कोटी 20 लाखांच्या नोटा चलनात आल्या. तर 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत फक्त 2 कोटी 90 लाख 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. 2019-20 आणि 2020-21 दरम्यान 2000 रुपयांच्या बँक नोटांच्या छपाईशी संबंधित कोणताही आदेश सरकारने जारी केलेला नाही. म्हणजेच 2000 च्या नोटा यापुढे छापल्या जाणार नाहीत.

हेही वाचाः इस्रायलच्या हल्ल्यात ‘हमास’चे ११ कमांडर ठार

एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही

सरकारसमवेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही आपल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे की, एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. आरबीआयच्या आकडेवारीनुसार 2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या एकूण 354.2991 कोटी नोटा छापल्या गेल्या. त्याच बरोबर 2017-18 या आर्थिक वर्षात केवळ 11.1507 कोटी नोटा छापल्या गेल्या, जे नंतरच्या आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 4.6690 कोटीवर पोहोचल्या.

हेही वाचाः भारतात कोरोना रुग्णसंख्या वाढीची WHO ने सांगितली कारणं…

एटीएममधून 2000 च्या नोटाही गायब

बिझिनेस टुडेच्या वृत्तानुसार, बँकेच्या एटीएममधील नोटांच्या कॅसेटमधून 2000 रुपयांच्या नोटांच्या कॅसेट काढून टाकल्या आहेत. 2000 च्या नोटांची कॅसेट 100 आणि 200 रुपयांच्या कॅसेटने बदलली आहे. हेच कारण बहुतेक एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा नसतात. काळ्या पैशाला आळा बसेल म्हणून सरकारने 2000 रुपयांच्या नवीन नोटा छापण्याचा निर्णय घेतला नाही.

हेही वाचाः नवोदय विद्यालयाची सहावीची प्रवेश परीक्षा पुढे ढकलली

तर 2000 ची नोट बंद होणार का?

2000 रुपयांची ही नोट वर्षं 2016 मध्येच छापली गेली. नोटाबंदीनंतर 1000 रुपयांची नोट चलनातून कालबाह्य झाल्यानंतर 2000 रुपयांची नवीन चलनात आणली. अर्थ राज्यमंत्र्यांनीही ज्या अहवालात असं म्हटलं होतं की, 2000 रुपयांची नोट बंद केली गेली. सध्या 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!