#भीषण! तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट

11 जणांचा होरपळून मृत्यू

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

चेन्नई : तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत होरपळून 11 जणांचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झालेत. खासगी कारखान्यात फटाके तयार करण्यासाठी काही केमिकल्सचं मिश्रण केलं जात असताना ही दुर्घटना झाली. सत्तूर जिल्ह्यात झालेल्या या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

स्फोट होताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण केमिकल्समुळे आग विझवण्यात त्यांना अडचण येत होती. कारखान्यात नियमांचं पालन केलं जात नसल्याने आग लागली असल्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांकडून शोक, मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पीडितांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे, तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी तीन लाखांची मदत जाहीर केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!