पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 11 गाड्यांची एकमेकांना धडक, मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा

हा अपघात खोपोली एक्झिटजवळ झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे

ऋषभ | प्रतिनिधी

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिटजवळ आज गुरुवारी 27 एप्रिल 2023 रोजी भीषण अपघात झाला असुन, सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. काही जखमींना रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी दुपारी सुमारे 11 वाहनांचा मोठा अपघात झाला. या अपघातात सात ते आठ जण जखमी झाले आहेत.जखमींना खोपली रूग्णालय आणि कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना दुपारी 1.15 च्या सुमारास घडली.मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तब्बल 11 वेगवेगळी वाहने एकमेकांवर आदळल्याने एकच खळबळ उडाली.

खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला

हा अपघात एक्स्प्रेस वेच्या मुंबईकडे जाणार्‍या लेनवर खोपोली एक्झिटजवळ घडला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.मबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे 45 मिनिटे प्रभावित झाली होती, मात्र, आता ती सुरळीत सुरू आहे.

महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मागील काही दिवसांपासून या महामार्गावर अपघाताचं प्रमाण खूपच वाढलं आहे. मागील काही दिवसांतच किमान किरकोळ अपघात धरुन 5 ते 6 अपघात झाले आहेत. यावर आता अवजड वाहनांसाठी काही नियम लागू करण्यात यावे जेणेकरुन लहान वाहनांनादेखील गाडी चालवण्यासाठी जागा मिळेल. अनेक ठिकाणी सुचना फलक लावलेले आहेत. तीव्र उताराचे देखील सूचना फलक आहेत मात्र या सुचना चालकांनी पाळण्याची गरज असल्याचं मत अनेकांनी बोलून दाखवलेल आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!