“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांची जीभ पुन्हा घसरली

ऋषभ | प्रतिनिधी
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची संभावना विषारी साप अशी केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कलबूर्गी येथे प्रचार सभेदरम्यान बोलत असताना मल्लिकार्जून खडगे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत. पण, तुम्हाला क्षणभर प्रश्न पडेल की ते विष आहे किंवा नाही. पण ते प्राशन करताच आपला मृत्यू होतो.”
मल्लिकार्जून खडगे यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले. ठाकूर म्हणाले की “मल्लिकार्जून खडगे यांनी केलेले वक्तव्य काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापेक्षाही वाईट आहे. काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाचे अध्यक्ष केले पण त्यांना कोणीही मानत नाही, म्हणून कदाचित मोदींचा अपमान केल्यावरतरी कोंग्रेस पक्षातले आपल्याला मान देतील या आशेने खडगे वारंवार पंत प्रधान मोदींचा अपमान करतायत. “

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील सुमारे 50 लाक भाजप कार्यकर्त्यांना व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती की, काँग्रेस म्हणजे खोटी हमी, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची हमी. पंतप्रधानांच्या टीकेला काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.