चांगली बातमी ! ‘या’ क्षेत्रात 1,50,000 नवीन रोजगार निर्माण होतील, सरकारच्या PLI योजनेचा फायदा होणार

सॅमसंग, फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगाट्रॉन, टाटा ग्रुप आणि सॅलकॉम्प सारख्या मोठ्या कॉर्पोरेट दिग्गज कंपन्यांनी देशात त्यांचे कार्यबल वाढवण्याची शक्यता असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

EMPLOYMENT : देशात उत्पादनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेचे फायदे आता रोजगाराच्या आघाडीवरही मिळू लागले आहेत. ही योजना लागू झाल्यानंतर देशाच्या ओवर ऑल निर्यातीत मोठा भाग व्यापलेला मोबाईल उत्पादन उद्योग यावर्षी झपाट्याने विस्तारणार आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षात देशातील मोबाइल उत्पादन उद्योगात 1,50,000 नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

PLI Scheme to Boost Manufacturing in India | SolutionBuggy
भारतातील उत्पादनाला चालना देण्यासाठी PLI योजना खूप मोठी भूमिका बजावणार . इमेज सोर्स : SolutionBuggy

ऑनलाईन गेमिंग, जुगाराच्या जाहिरातींवर यापुढे बंदी

इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात रिक्रूटमेंट फर्मच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, मोठ्या हँडसेट निर्माते भारतात मोठ्या प्रमाणात नोकरभरतीची योजना आखत आहेत. अहवालात असे म्हटले आहे की चीनबाहेरील उत्पादनाकडे जागतिक स्तरावर झालेले बदल आणि भारत सरकारच्या उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनेमुळे हा बदल दिसून येत आहे.

16 companies including Samsung, iPhone makers approved under PLI

सॅमसंग, नोकिया, फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगाट्रॉन, टाटा ग्रुप आणि सॅलकॉम्प यांसारख्या मोठ्या कॉर्पोरेट दिग्गज कंपन्या देशात त्यांचे कर्मचारी वाढवण्याची शक्यता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. टीमलीज, रँडस्टॅड, क्वेस आणि सील एचआर सर्व्हिसेस सारख्या स्टाफिंग कंपन्यांनी म्हटले आहे की या आर्थिक वर्षात या क्षेत्रात अंदाजे 120,000-150,000 नवीन नोकऱ्या निर्माण होतील. यापैकी जवळपास 30,000-40,000 भरती थेट पदांवर होण्याची शक्यता आहे. 

“बहुतेक मोबाइल ब्रँड्स आणि त्यांचे घटक उत्पादन आणि असेंबली भागीदार, ज्यांचे आधीच भारतात काही प्रकारचे उत्पादन आहे किंवा ते स्थापन करण्याचा विचार करत आहेत, ते नोकरभरतीत वाढ करत आहेत,” टीमलीज सर्व्हिसेसचे सीईओ (स्टाफिंग), कार्तिक नारायण यांनी ET ला सांगितले. अहवालानुसार, Quess आणि CIL मधील HR एक्झिक्युटिव्ह्सनी सांगितले की त्यांनी FY2023 च्या तुलनेत या आर्थिक वर्षात भरतीमध्ये 100 टक्के वाढ केली आहे.

Electronics makers struggle to meet PLI scheme target | Mint
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!