कचरा वाहतूक करणारा ट्रक पलटी; गावात रोगराई पसरण्याची शक्यता

ट्रक पडलेल्या ठिकाणी नागरिकांची घरे असुन तेथील नागरिकांना व गावातील लोकांना याचा त्रास होत आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

खानापूर : गोव्याहून बेळगाव कडे कचरा वाहतूक करणारा ट्रक गुंजी गावातील वळणावर पलटी झाल्याने ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला आहे परंतु ट्रक मधील प्लॅस्टिक व घाण असलेला कचरा टाकीतून रस्त्यावर पडल्याने अति दुर्गंधी सुटली आहे.

ट्रक पडलेल्या ठिकाणी नागरिकांची घरे असुन तेथील नागरिकांना व गावातील लोकांना याचा त्रास होत आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते पंकज कुट्रे यांनी सदर ट्रक मालकास मोबाईल द्वारे कल्पना दिली आहे. परंतु त्यांचा अजून पत्ता नाही. त्यामुळे खानापूर पोलिसांनी या गोष्टीकडे ताबडतोब लक्ष घालून तो ट्रक व कचरा हटविण्यास सदर ट्रक मालकाला सांगावे व या दुर्गंधी पासून व होणाऱ्या रोगापासून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी या गावातील नागरिक करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!