आधी सामूहिक बलात्कार आणि मग नग्न परेड ! दोषींवर कारवाई होणार-मणिपुर मुख्यमंत्री

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 20 जुलै : मणिपूरमध्ये दोन महिलांची सामूहिक बलात्कार करून नग्न परेड करण्यात आल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी कठोर भूमिका घेतली आहे . सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत .
या प्रकरणातील पहिली अटक आज सकाळी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी गुरुवारी सांगितले की, व्हिडिओ समोर येताच, राज्य सरकारने व्हिडिओची स्वतःहून दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले. ते म्हणाले की मणिपूर पोलिसांनी कारवाई केली आणि आज सकाळी पहिली अटक केली. सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. फाशीच्या शिक्षेच्या शक्यतेसह सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याची आम्ही खात्री करू. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सदर अमानुष घटनेचे विडिओ तत्काळ हटविण्याचे निर्देश देलेले आहेत.
शहा यांचे आदेश
अमित शहा यांनी गुरुवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांच्याशी बोलले. 4 मेच्या घटनेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजते. सूत्रांनी सांगितले की, शाह यांनी सिंग यांना या घटनेत सामील असलेल्या सर्वांना पकडण्यासाठी आणि कायद्यानुसार योग्य कारवाई करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलण्यास सांगितले.

असे आहे प्रकरण
मणिपूर सध्या वांशिक हिंसाचाराच्या विळख्यात आहे, परंतु आता मणिपूरच्या डोंगराळ भागात एका व्हिडिओवरून तणाव पसरला आहे ज्यामध्ये दोन महिलांची नग्न परेड केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओ 4 मे चा आहे आणि दोन्ही महिला कुकी समुदायातील आहेत, तर जे पुरुष महिलांची नग्न परेड करत आहेत ते सर्व मेतेई समुदायातील आहेत. दोषींवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी संघटना इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने केली आहे.
अबलांचा आक्रोश
इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमच्या म्हणण्यानुसार, राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ही घटना 4 मे रोजी घडली. त्याचबरोबर या प्रकरणी अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की पुरुष रडत असलेल्या असहाय महिलांचा सतत विनयभंग करत आहेत.