अॅक्सिस बँकेतर्फे ग्रामीण आणि निम- शहरी ग्राहकांसाठी ‘संपन्न’ ही प्रीमियम बँकिंग सेवा लाँच

Goan Varta Live | प्रतिनिधी
- ग्राहकांना शेती मालावर सवलत, व्यक्तीगत गरजेनुसार आर्थिक योजना आणि कर्जावर प्राधान्यानुसार किंमत अशा खास ऑफर्सचा लाभ घेता येईल.
- बँकेने देशभरातील ग्राहकांना त्यांच्या अर्थाजनात मदत करत सक्षम करण्याचे, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्यसेवा, कौटुंबिक बँकिंग योजना व रिलेशनशीप व्यवस्थापक अशा सेवा देण्याचे ध्येय ठेवले आहे.
लुधियाना, ३१ जुलै २०२३ – अॅक्सिस बँक या देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या बँकेने आज ‘संपन्न’ ही प्रीमियम बँकिंग सेवा लाँच केली. ही सेवा ग्रामीण आणि निमशहरी भागातील विकास आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आली आहे. ही नवी योजना अॅक्सिस बँकेच्या रूसु (रूरल अँड सेमी अर्बन) या ग्राहकाभिमुख धोरणाचा भाग आहे. अॅक्सिस बँकेने नव्या युगातील भारतीय ग्राहकांना सेवा देण्याचे ठरवले असून त्यासाठी खास योजना तयार केल्या जात आहेत. या योजना त्यांना सहजपणे उपलब्ध करून देण्यावरही बँकेचा भर आहे.

संपन्न या योजनेच्या माध्यमातून अॅक्सिस बँक खास लाभ देणार असून त्यात शेती उपकरणे, कीटकनाशके, बियाणे अशा कच्च्या मालावर सवलती, पिकविषयक सल्ला, हवामान अंदाज, बाजारभाव अशा मूल्यवर्धित सेवा यांचा समावेश आहे. त्याशिवाय ग्राहकांना शेती कर्ज, सुवर्ण कर्ज, ट्रॅक्टरसाठी कर्ज, ऑटो आणि दुचाकी कर्ज इत्यादींवरील प्रक्रिया शुल्कात सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांना व्यवसाय विस्तार किंवा वाहन खरेदी करणे अथवा घर घेणे अशा वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक वित्त साधने सहजपणे उपलब्ध करण्यासाठी संपन्न खास तयार करण्यात आले आहे.
त्याशिवाय संपन्नद्वारे संपूर्ण कुटुंबासाठी बँकिंग योजना, लॉकरवर सवलती, व्यवहार संख्येची जास्त मर्यादा व त्यासह मोफत डेबिट आणि कार्ड, सवलतीत डिमॅट सेवा, खास रिलेशनशीप व्यवस्थापक या व अशा विविध सेवा दिल्या जाणार आहेत. बँकिंगचा एकंदर अनुभव उंचावण्यासाठी प्रीमियम लाभ दिले जाणार असून त्यात मोफत आरोग्य सेवा आणि सुरक्षा कवच उदा. ३००० रुपयांपर्यंत हॉस्पिकॅश कव्हर, २४x७ आपत्कालीन डॉक्टर सल्लासेवा आणि मोफत आरोग्य तपासणी यांचा समावेश आहे.

संपन्नच्या लाँचविषयी श्री. मुनीश शारदा, समूह एक्झक्युटिव्ह आणि प्रमुख – भारत बँकिंग, अॅक्सिस बँक आणि श्री. रवी नारायणन, समूह एक्झक्युटिव्ह आणि प्रमुथ – शाखा बँकिंग, रिटेल लायबिलिटीज आणि उत्पादने, अॅक्सिस बँक म्हणाले, ‘संपन्न लाँच करत आम्ही ग्रामीण व निमशहरी भागातील ग्राहकांना प्रीमियम बँकिंग सेवा समान प्रमाणात उपलब्ध करून देत आहोत. शेती मालावर सवलती देत आणि शेती विकासाला चालना देत आम्ही शेतकरी समाजाची प्रगती व उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे. ग्राहकाभिमुख उत्पादने तयार करून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत भारत बँकिंग फ्रँचाईझी तयार करण्याच्या बांधिलकीतून संपन्नचे लाँच करण्यात आले आहे.’

संपन्नच्या माध्यमातून अॅक्सिस बँक शेती, व्यापारी, लघु उद्योगांपर्यंत पोहोचून त्यांची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षांसाठी योग्य उत्पादने तयार करणार आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यावरही बँकेने भर देण्याचे ठरवले आहे. ग्रामीण मूल्य साखळीत विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी बँक भागिदारीही करणार आहे. बँकेने किफायतशीरपणे अस्तित्व स्थापन करण्यासाठी आणि दुर्गम ग्रामीण भागातील सेवा वितरण सुधारण्यासाठी आपल्या बिझनेस करस्पॉडंट मॉडेलचा वापर करण्याचे ठरवले आहे.