अत्यावश्यक औषधांच्या किंमती एप्रिलपासून वाढणार ? एकीकडे आजारपण आणि दुसरीकडे औषधांच्या वाढत्या किंमती , सामान्य जनतेने करायचे तरी काय ?

 अत्यावश्यक औषधांच्या किंमती एप्रिलपासून वाढणार आहेत. त्यामुळे आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

Ceiling prices of 21 key medicines raised by 50%; NPPA invokes DPCO 2013 |  Business Standard News

Essential Drugs Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. अत्यावश्यक औषधांच्या (Essential Drugs) किंमती एप्रिलपासून वाढणार आहेत. केंद्र सरकार (Central Government) आता औषध कंपन्यांना अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढवण्याची परवानगी देणार आहे. त्यामुळे आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.

Now, expert committee to plan medicine supply in govt hospitals in UP -  Hindustan Times

अत्यावश्यक औषधांच्या किंमती एप्रिलपासून वाढणार

एप्रिल महिन्यापासून अत्यावश्यक औषधांच्या (Medicine) किंमतीत वाढ होणार आहे. पेनकिलर, ॲंटिबायोटिक तसेच हृदयरोगपर्यंतच्या सर्व औषधांच्या किंमतीत वाढ होणार आहे. महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावरील बोजा वाढणार आहे. औषधांच्या किंमतीत 12 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ करण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री

दुसरीकडे, शेड्युल ड्रग्जच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे. मात्र, यासंदर्भात किंमती किती टक्क्यांनी वाढणार याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर फार्मा उद्योगाकडून औषधांच्या किमतीत वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. घाऊक किंमत निर्देशांकांमधील बदलांच्या अनुषंगाने औषध कंपन्यांना दरवाढ करण्याची परवानगी देण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचं समोर आलं आहेत.

Steep Hike On Medicine Prices Will Upturn People's Lives | Kerala |  Deshabhimani | Tuesday Mar 29, 2022

अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत 12 टक्क्यांहून अधिक वाढ

अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ करण्यात येणार असून त्यामुळे पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, कार्डियाक ड्रग्स आणि अँटीबायोटिक्ससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मधील बदलानुसार औषध कंपन्यांना वाढ करण्याची परवानगी देण्यासाठी परवागनी देण्याची सरकारची तयारी आहे. WPI मधील वार्षिक बदल, सरकारने अधिसूचित केल्यानुसार, 2022 मध्ये 12.12 टक्क्यांपर्यंत असू शकते. सोमवारी औषध किमती नियामक राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने परिपत्रक जाहीर करत ही माहिती दिली आहे.

बनावट औषधे बनवणाऱ्या कंपन्यांवर सरकारची मोठी कारवाई, १८ जणांचे परवाने रद्द, कारवाई सुरूच

बनावट औषधे बनवणाऱ्या कंपन्यांवर सरकारने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 20 राज्यांमधील 76 कंपन्यांची तपासणी केल्यानंतर सरकारने मंगळवारी बनावट औषधांच्या निर्मितीसाठी 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द केले. बनावट औषधांच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या देशभरातील अनेक फार्मा कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Medicines News - Latest medicines News, Information & Updates - Health News  -ET HealthWorld
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!