अमेरिकेचा नवा बॉस कळण्यासाठी वेळ का लागतोय? ही आहेत ३ सोपी कारणं… #USAElections2020

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : अमेरिकेत निवडणुकीची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. मतमोजणी सुरु आहे. पण अजूनही निकाल हाती आलेला नाही. लढच चुरशीची होतेय. कोण जिंकणार ही लढाई, याकडे संपूर्ण जगाची नजर लागली आहे. अशातच निकाल हाती यायला इतका वेळ का लागतोय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. चला तर जाणून घेऊयात त्याची ही तीन सोपी कारणं
1 निकाल यायला इतका वेळ का लागतोय?
अमेरिकेत विक्रमी मतदान झालंय. त्यातील तब्बल दहा कोटी मतं की फक्त मेल-ईनच्या माध्यमातून टाकण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय. याचा अर्थ असा की मतदान ज्या दिवशी होतं, त्याआधीच इतक्या लोकांनी मतदान केलं होतं. जवळपास १६ कोटी मतदारांनी यंदा रजिस्ट्रेशन केलं होतं. यातील अर्ध्याहून अधिक मतं मेलद्वारे करण्यात आलीत.
अमेरिकन मीडियाने दिलेल्या काही रिपोर्टनुसार, महत्त्वाची माहिती समोर येते आहे. आतापर्यंत काही राज्यांनी फक्त तीच मतं मोजली आहेत, जी ३ नोव्हेंबरला टाकण्यात आली होती. याचाच अर्थ अजूनपर्यंत काही राज्यांमधील मेलद्वारे आलेल्या मतांची मोजणी झालेली नाही. तर दुसरीकडे अनेक छोट्या राज्यात दोन्ही प्रकारे टाकण्यात आलेल्या मतांची मोजणी सुरु आहे. त्यामुळे सध्या जे कल हाती येत आहेत, त्यावर तातडीनं कोण जिंकलं, याचा निष्कर्ष काढता येऊ शकत नाही. मेल-ईन द्वारे आलेल्या मतांची मोजणी करण्यासाठी काही दिवस लागू शकतात, असं आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.
I will be making a statement tonight. A big WIN!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 4, 2020
2 कोर्टापुढे जाणार निकाल?
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक सनसनाटी आरोप केलाय. काही राज्यांत मतांची मोजणी चुकीची होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. साहजिकच काही राज्यांतील निकालांवर कोर्टातही लढाई होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. दुसरीकडे जो बायडन यांनीही कोर्टाच्या लढाईसाठी तयार असल्याचं म्हटलंय. तसं झालं, तर हा निकाल आणखी लांबण्याची शक्यता जास्त आहे.
We feel good about where we are. We believe we are on track to win this election.
— Joe Biden (@JoeBiden) November 4, 2020
3 टाय झाला तर?
सीझन आयपीएलचा आहे. टी-ट्वेन्टीमध्ये टाय झाली तर सुपर ओव्हर होते. पण अमेरिकेतल्या निवडणुकीतही टाय होण्याची शक्यता आहे. जर डेमोक्रेटीक आणि रिपब्लिक या दोघांना 269-269 इतके इलेक्टोरल वोट मिळाले, तर काय होणार, असाही प्रश्न अनेकांना पडलाय. तसं झाल्यास अमेरिकी सिनेटवर सगळ्यांची नजर खिळेल.
टाय झाल्यास हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह सगळ्यात आधी उपराष्ट्रपती पदाची निवड करतील. त्यानंतर वोटींगच्या माध्यमातून पूर्ण सीनेट राष्ट्रपती कोण होणार, याची निवड करतील. या प्रक्रियेलाही वेळ लागू शकतो. विशेष म्हणजे तसं झालं तर अमेरिकेचा नवा राष्ट्रपती कोण होणार, हे समोर येण्यासाठी कदाचित डिसेंबरही उजाडेल, असंही सांगितलं जातं.
अमेरिकेत मतदानानंतर इलेक्टर्स निवडले जातात. तेच राष्ट्राध्यक्ष कोण होणार, हे निवडतात. येत्या 14 डिसेंबरला अमेरिकेच्या सीनेटचं मतदान होईल. तिथे 538 इलेक्टर्स नवीन राष्ट्रध्यक्ष कोण होणार, या निवडणुकीसाठी मतदान करतील. त्यात ज्याला 270 किंवा त्यापेक्षा जास्त मतं पडतील, जो जिंकणार.
कोण पुढे कोण मागे?
शेवटचं वृत्त लिहीत असताना जो बायडन 238ने आघाडीवर होते. तर डोनाल्ड ट्रम्प 213ने पिछाडीवर होते.