Video | CCTV | रेल्वे लाईन क्रॉस करतानाच गाडी अडकली, रेल्वेनं चिरडलं!

ही दृश्य तुम्हाला विचलीत करु शकतात!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एक अंगावर काटा आणणार अपघात समोर आला आहे. घटना आहे श्रीलंकेतील. श्रीलंकेतील एका रेल्वे क्रॉसिंगवर भीषण घटना घडली. यामध्ये एका कारला रेल्वेनं चिरडलंय. विशेष म्हणजे या थराराक घटनेचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय.

नेमकं काय घडलं?

डेली मिररनं जारी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक रेल्वे गाडी कारचा चिरडताना दिसून आली आहे. एका काळ्या रंगाची कार रेल्वे क्रॉसिंगवेळी रेल्वे रुळाच्या एका बाजूला येऊन थांबली. नेमक्या त्याच वेळी या मार्गावरुन जाणाऱ्या रेल्वेनं या कारला धडक दिली. यामध्ये कारमधील चालक गंभीररीत्या जखमी झालाय. तर कारचाही चक्काचूर झाला आहे. श्रीलंकेतूल नुगेगोडा भागात हा भीषण अपघात घडलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा : Video | LEOPARD | कारमधील कॅमेरात बिबट्या कैद

ज्याठिकाणी हा अपघात घडला, त्या रेल्वे ट्रॅक शेजारी मोठी झोपडपट्टी असल्याचंही दिसून आलंय. काही लोकांनी या अपघाताचा थरारा प्रत्यक्ष अनुभवल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय. ही धडक इतकी भीषण होती, सगळेच जण हादरुन गेले.

पाहा व्हिडीओ –

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!