जगाचा विनाश जवळ आलाय? चीनमध्ये महाप्रलय! पाहा महापुराचे महाभयंकर Video

रस्ते, मेट्रो आणि घरांमध्ये घुसलं पुराचं पाणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

चीन : सलग दुसऱ्या वषी चीनमध्ये पुराचं संकट ओढावलं आहे. गेल्यावेळपेक्षाही यंदाचा चीनमधील पूर हा जास्त भीषण आहे. या पुरामुळे चीनमधील लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. स्थलांतराची ही प्रक्रिया अजूनही सुरुच आहे. धक्कादायक बाबा म्हणजे चीनमधील फक्त रस्त्यांवर किंवा घरामध्ये पुराचा फटका बसला नाहीये. तर मेट्रोल स्थानकांसह मेट्रोमध्ये पुराचं पाणी शिरुन लोकांचे हाल झाल्याचं पाहायला मिळालंय. या महापुराचे थराराक व्हिडीओ समोर आले आहे.

गेल्या चार दिवसांपासून चीनमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पुरामुळे कमीत कमी १२ जणांचा मृत्यू झाला असून या मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. असंख्य लोक या महापुरामध्ये अडकलेत. अनेक वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेलीत. चीनमधील काही भागांमध्ये आठ इंचाहून अधिक पाऊस झालाय. गेल्या १ हजार वर्षातला हा सर्वात मोठा पूर असल्याचं काहींनी म्हटलंय. दरम्यान, आता मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलंय. तर काही ठिकाणी लष्कराची मदतही घेतली जातेय.

चीनमध्ये महापुरामुळे रस्ते जलमय झाल्यामुळे हजारोजण भुयारी मार्ग, शाळा आणि कार्यालयांमध्ये अडकलेत. पुरात असंख्य वाहनं वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालंय. चीनमधील शिन्हुआ या वृत्तसंस्थेने हेनान हवामान खात्याच्या हवाल्याने म्हटले की, हेनान प्रांताची राजधानी झेंग्झू येथे मंगळवारी सायंकाळी ४ ते ५ दरम्यान सुमारे आठ इंच पाऊस झाला. आतापर्यंतचा हा विक्रमी पाऊस असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळेच महापुराने चीनला वेढलंय.

People look out at cars sitting in floodwaters after heavy rains hit the city of Zhengzhou in China’s central Henan province on July 21, 2021. (Photo by STR / AFP) / China OUT

झेंग्झूच्या उत्तरेकडील प्रसिद्ध शाओलिन मंदिरालाही अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलाय. हेनान प्रांतातील सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी जगातील पर्यटकांचा ओढा असतो. चीनमधील हा प्रांत उद्योग आणि शेतीसाठी ओळखला जातो. दरम्यान, आता आलेल्या महापुरामुळे या प्रांताचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आलंय.

दुसरीकडे पुरामुळे अनेकजण कार्यालयातच थांबले आहेत. तर, काहींनी हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे वीज पुरवठा खंडीत झालाय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा : Video | महापुराचा वेढा, पहिल्या मजल्यापर्यंत चिपळुणात पुराचं पाणी

हेही वाचा : ChiplunFlood | महापुराने चिपळूण बस स्टँडसह एसटीही पाण्याखाली

मेट्रोमध्ये पुराचं पाणी, लोकं आतमध्येच अडकली

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!