#GOOD NEWS : कोरोनावर ब्रिटनमध्ये लस आली

ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून लसीकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

लंडन : कोरोनावर जगातील पहिली लस आलीय. ही लस ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारनं फायझर बायोएनटेकच्या लसीला परवानगी दिलीय. पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. करोनावरील लसीला परवानगी देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरलाय. काही दिवसांपूर्वी फायझरने करोनावर लस तयार केल्याची घोषणा केली होती.

ब्रिटनची आघाडी

सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारकता या सर्व कसोट्यांमध्ये लस उत्तीर्ण झाल्याचं ब्रिटन सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय. दुसरीकडे, अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. युरोप किंवा अमेरिकेत सर्वात आधी लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना कोरोनावरील लसीला मान्यता देणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरलाय.

लस 95 टक्के प्रभावी

फायझरची लस करोनावर 95 टक्के प्रभावी असून जर्मनीतील औषध निर्माण कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकनस्थित कंपनी फायझरने युरोपियन युनियनकडे लसीच्या नोंदणीसाठी अर्ज केलाय. जगात फायझरच्या लशीचे 5 कोटी डोस तयार केले जाणार आहेत. 2021 अखेर १.3 अब्ज डोस उपलब्ध केले जातील. एकूण 170 स्वयंसेवकांवर लसीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. 65 वर्षांवरील व्यक्तीतही ही लस प्रभावी ठरली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!