अमेरिकेचे ‘पवार’ जो बायडन आणणार का महाविकास आघाडी सरकार?

पवारांसारखी बायडन यांनीही भर पावसात सभा सुरुच ठेवली

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : वारे निवडणुकीचे वाहत आहेत. ठिकाण आहे अमेरिका. ट्रम्प विरुद्ध बायटन सामना रंगात आला आहे. या सामन्यात पावसाने खोडा करण्याचा प्रयत्न केला. पण जो बायडन (Joe Biden) मागे हटले नाहीत. त्यांनी आपली सभा सुरुच ठेवली. फोटो वायरल झाले. बायडन ट्रेंड होऊ लागले. आणि सगळ्यांनीच तुलना करायला सुरुवात केली. शरद पवारांनीही भर पावसात सभा घेतल्यानंतर महाराष्ट्रात जो परिणाम मतांवर पाहायला मिळाला, तसा परिणाम अमेरिकेतही पाहायला मिळणार का याची चर्चा सगळ्यांच देशांमध्ये रंगू लागली आहे.

गल्लोगल्ली चर्चा

गंमत म्हणजे पवारांनी केलेल्या पावसातल्या सभेचा फोटोची क्वालिटी बघा. आणि जो बायडन यांचा भर पावसातला फोटो बघा. क्लिएरीटीचा मुद्दा सोडला, तर कंटेट या दोन्ही फोटोंनी भरभरुन दिलाय, हे कोण नाकारेल. कारण भरपावसात केलेल्या सभेनंतर महाराष्ट्रात युतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार आलं. यामध्ये पवारांच्या त्या सभेचा मोलाचा वाटा होता. तसंच काहीसं अमेरिकेत होणार का, अशी चर्चा गल्लोगल्ली रंगलीये.

शरद पवारांचा नातू आणि महाराष्ट्राचे आमदार रोहित पवार यांनीही बायडन यांचा फोटो शेअर केलाय.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन तेल लावून राजकीय कुस्तीच्या मैदानात उतरलेत. सभेदरम्यान आलेला पाऊस त्यांना मदत करतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचंय. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचं बायडन यांच्यासमोर तगडं आव्हान आहे. तीन दिवसांआधी घडलेल्या या घटनेनं महत्त्वाची कलाटणी मिळणार का, याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय.

कोण पुढे कोण मागे?

राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये जो बायडन हे आघाडीवर असल्यां वृत्त बीबीसी मराठीने दिलं आहे. मात्र यात कोण पुढे आहे आणि कोण मागे, यावरुन कोण निवडणूक जिंकणार हे ठरत नाही. अमेरिकीते इलेक्टोरल कॉलेज पद्धत वापरली जाते. म्हणूनच जास्त मतं मिळाली म्हणजे निवडणूक जिंकली, असं होत नाही. किती मतं मिळतात, यापेक्षा मतं कुठून मिळतात, हे जास्त महत्त्वाचं असतं.

अमेरिके एकूण 538 इलेक्टोरल कॉलेज मतं आहेत. जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान 270 मतं जिंकावी लागतात. तूर्तास सध्या तरी बायडन यांच्याबाजुने कल दिसत असला, तरी दिल्ली अभी दूर है, असं म्हणायला हरकत नाही. तोपर्यंत बायडन यांचा पावसातील सभेचा फोटो तुफान भाव खाऊन गेलाय. फक्त त्याची जादू कितपत होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

हेही वाचा –

भारतात पबजीचा खेळ खल्लास

नोव्हेंबरमध्ये बँका 15 दिवस राहणार बंद

म्हापसा अर्बन बँकेसंदर्भातली महत्त्वाची बातमी

जगभरातल्या महत्वाच्या बातम्या

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!