Tokyo 2021 : अभिमानास्पद! रस्त्यावर कचरा गोळा करणारा जेव्हा ऑलिम्पक मेडल जिंकतो…

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः टोकियो ऑलिम्पिकमध्ये काही खेळाडूंनी विश्वविक्रम करताना पदके जिंकली, तर काहीजण अनुभवाचा पुरेपर वापर इतरांसाठी प्रेरणादायी ठरला. ऑलिम्पिकमध्ये असे अनेक खेळाडूी असतात, ज्यांचा पदक जिंकल्यानंतर संघर्ष वाचला जातो. त्यातीलच एक नाव म्हणजे फिलिपिन्सचा कार्लो पालम. बॉक्सिंगपटू पालमने फ्लाईवेटमध्ये रौप्यपदक जिंकलं आहे.
हेही वाचाः BREAKING| नीरज चोप्राने सोनं लुटलं, भालाफेकीत भारताला सुवर्ण
एकेकाळी रस्त्यावर कचरा गोळा करणारा पालम आता ऑलिम्पिक पदक विजेता झाला आहे. भारताच्या अमित पांघलने बॉक्सिंग ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत त्याच बॉक्सरला पराभूत करून टोक्यो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवलं होतं. मात्र, याच ऑलिम्पिकमध्ये पांघलने सर्वांना निराश केलं.
हेही वाचाः मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे इथं कंटेनरला अपघात
पदक जिंकल्यानंतर कार्लो पालम सध्या स्वप्नातच जगत आहे. एक काळ असा होता, जेव्हा तो रस्त्यावर कचरा उचलायचा आणि कदाचित त्याला त्यावेळी ऑलिम्पिकबद्दल माहितीही नव्हती.
हेही वाचाः शाब्बास! बजरंग पुनियानं केली कांस्य पदकाची कमाई
आईनं वडिलांना सोडलं तेव्हा…
१६ जुलै १९९८ रोजी बुकिडोंन येथे जन्मलेल्या पालमने बालपण बालिंगाओंमध्ये व्यतीत केलं. जेव्हा तो सहा वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या आईने वडिलांना सोडलं. यानंतर, कार्लोचे वडील त्याला चांगली संधी शोधण्यासाठी कॅगायन डी ओरोस शहरात घेऊन गेले. यानंतर कार्लोने कचरा उचलण्यास सुरुवात केली. यानंतर त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला बॉक्सिंगच्या स्थानिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं, कार्लोनेही वयाच्या ७व्या वर्षी पहिला सामना जिंकला. मग बॉक्सिंग स्पर्धा जिंकणं त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी पोट भरण्याचा एक मार्ग बनला. हा तो काळ होता जेव्हा त्याच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं.
हेही वाचाः BLAST | हेडफोन्सचा स्फोट होऊन तरुणाचा मृत्यू
२००९मध्ये, पार्क स्पर्धेदरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आणि त्याला कॅगायन डी ओरोस बॉक्सिंग प्रशिक्षण कार्यक्रमात समाविष्ट केलं. २०१३मध्ये, कार्लोचा फिलिपिन्सच्या राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आणि येथून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली.