रशियातील शाळेत गोळीबार; १३ जणांचा जागीच मृत्यू…

हल्लेखोराचीही आत्महत्या : मृतांमध्ये ७ मुलांचा समावेश; २० गंभीर जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मॉस्को : रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत सोमवारी एकाने केलेल्या गोळीबारात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ७ विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांचे वय ११ वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय शाळेतील दोन शिक्षक आणि दोन सुरक्षा रक्षकांचाही मृत्यू झाला.
हेही वाचाःCrime | अधिकाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून घेतला रस्ता बांधून…

शहराची लोकसंख्या ६ लाख ४० हजार

माध्यमांच्या अहवालानुसार, रशियाची राजधानी मॉस्कोपासून इझेव्हस्क हे शहर ९६० किमी अंतरावर असून हे उदमुर्तिया राज्याचा एक भाग आहे. हा परिसर औद्योगिक केंद्र म्हणून ओळखला जातो. या शहराची लोकसंख्या ६ लाख ४० हजार आहे.
हेही वाचाःAccident | ट्रॅक्टर तलावात उलटून झालेल्या अपघातात आठ महिलांसह दोन मुलांचा मृत्यू …

घटनेची राज्यपालांनी केली पुष्टी

उदमुर्तिया राज्याचे राज्यपाल अलेक्झांडर ब्रेचलोव्ह यांनी घटनेची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, शाळा सुरू झाल्यानंतर ही घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने बंदूक घेऊन संरक्षक भिंतीवरून उडी मारून शाळेत प्रवेश केला. त्यामुळे सुरक्षारक्षकांच्या नजरेतून तो सुटला. शाळेच्या आवारात आल्यानंतर या हल्लेखोराने अचानक वर्गात जाणाऱ्या मुलांवर गोळीबार सुरू केला. काही कळण्याच्या आतच या अचानक हल्ल्याने शाळेत चेंगराचेंगरी सुरू झाली. आरडाओरड धावाधाव सुरू झाली. जेव्हा सशस्त्र सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला घेरले तेव्हा त्याने स्वतःच्या हातातील बंदूकीने कपाळावर गोळी झाडली. यात तो जागीच गतप्राण झाला.
हेही वाचाःIND vs SA : गोलंदाजांमुळे भारताची विजयी सलामी; दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव…

पोलिसांनी केला परिसर सील 

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी इझेव्हस्क शहरातील शाळेच्या भागाला वेढा घातला आहे. हल्लेखोर एकटा नसून त्याच्यासोबत आणखी कोणीतरी असण्याची शक्यता पोलिसांना आहे. परिसरातील प्रत्येक घराची झडती घेतली जात आहे. हल्लेखोर कोण होता आणि त्याचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलीस संरक्षणात मुलांना शाळेतून घरी पाठवले जात आहे. २० जण जखमी झाले असून त्यात बहुतांश विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. यापैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यपालांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोराचाही मृत्यू झाला होता. विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
हेही वाचाःAccident | रस्त्यावरील गुरांमुळे दोन दुचाक्या एकमेकांना धडकल्या…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!