संपूर्ण भारत साखर झोपेत असताना अमेरिकेत दंगल

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत गृहयुद्धाची स्थिती निर्माण झालीये.

Goan Varta Live | प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेत झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं राजकारण संपायला तयार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप लावलाय. सोबतच आता ट्रम्प त्यांच्या समर्थकांसोबत मिळून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. यादरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगसमोर मोठ्यासंख्येने जमा होत राडा घातलाय. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय.

नक्की काय घडले?

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत गृहयुद्धाची स्थिती निर्माण झालीये. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून हिंसाचार केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी इलेक्टोरल कॉलेजबाबत होणाऱ्या बैठकीच्या अगोदर गुरूवारी कॅपिटल बिल्डिंगमध्ये राडा केलाय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलीये. संसदेत घुसून हिंसाचर केलाय. या घटनेमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जातेय. ट्रम्प यांनी आपला पराभव अद्यापही मान्य केला नाहीये. जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा होणार होती. त्याच वेळेस ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात केली. पण त्या आधीच ट्रम्प समर्थकांनी इमारतीत घुसखोरी केली. यामुळे संसदेत एकच गोंधळ निर्माण झालाय.

‘ट्रम्प यांनी संविधानाची सुरक्षा करावी’

नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले जो बायडेन यांनी ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केलेय. ‘मी राष्ट्रपती ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावं आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावं’ असं बायडेन म्हणालेत.

‘सत्तेचं हस्तांहरण शांतपूर्वक व्हायला हवं’

पंतप्रधान मोदींना या घटनेवर ट्विट केलंय. ते ट्विटमध्ये म्हणालेत,’वॉशिंग्टन डीसीमध्ये राडा आणि हिंसा याची माहिती मिळाल्यानंतर मी जास्त चिंतित आहे. सत्तेचं हस्तांहरण हे अतिशय क्रमबद्ध आणि शांतपूर्वक व्हायला हवं.’

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केलं ट्विट

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ट्विट केलंय. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय,’अमेरिकेत काँग्रेसची लज्जास्पद वागणूक. संयुक्त राज्य असलेल्या अमेरिकेने आतापर्यंत जगभरात लोकतंत्रासाठी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता हे महत्वपूर्ण आहे की हस्तांतरण हे अतिशय शांतिपूर्ण आणि व्यवस्थित पद्धतीने झालं पाहिजे.’

काय आहे संपूर्ण वाद?

अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी ३ नोव्हेंबर २०२० रोजी निवडणूक झाली. ज्यामध्ये डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन यांना ३०६ इलेक्टोरल कॉलेज वोट आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना २३२ मत मिळालेली. निकाल असा असूनही डोनाल्ड ट्रम्प यांनी पराजय स्विकारलेला नाहीये. याबाबत राज्यात ट्रम्प समर्थकांद्वारे केस देखील दाखल केली होती. मात्र कोर्टाने ते अर्ज फेटाळले आहेत.

वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू

डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगसमोर मोठ्यासंख्येने जमा होत राडा घातला. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला.

हिंसाचारात एका महिलेचा मृत्यू

निवडणुकीच्या निकालांनंतर अमेरिकेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावण्यात आलेली. मात्र, या बैठकीपूर्वीच ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल भवनसमोर गर्दी करण्यास सुरुवात केली. यावेळी मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर पोलीस आणि समर्थकांमध्ये झटापटही झाली. या हिंसाचारात गोळी लागून एका महिलेचा मृत्यूही झाला. तसंच हिसेंत अनेक अधिकारी जखमी झालेत.

शांतता ठेवा, ट्रम्प यांचं समर्थकांना आवाहन

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना आवाहन केलंय. ते म्हणालेत, शांततेत निदर्शनं करावी. आंदोलनादरम्यान हिंसा व्हायला नको. लक्षात ठेवा आपला पक्ष कायदा आणि सुव्यवस्था मानणारा पक्ष आहे.

कॅपिटल भवनात नॅशनल गार्ड तैनात

या आंदोलनादरम्यान, काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर नॅशनल गार्डला कॅपिटलच्या दिशेने रवाना करण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, कॅपिटल इमारतीत एक अग्निशामक यंत्र फुटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!