इथे मध्यरात्रीही तळपतो सूर्य…

जगभरातील 'ही' सहा ठिकाणं, जिथं 6 महिने होत नाही सूर्यास्त!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः दिवस संपल्यानंतर सूर्यास्त होणार हे निश्चित आहे. परंतु कधीकधी आपण विचार करतो की, सूर्यास्त नसल्यास किती चांगलं होईल. पण तसं होणं अशक्य आहे. जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे वर्षातील अनेक दिवस सूर्यास्त होत नाही. यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे, पण हे खरं आहे की, जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे रात्र होत नाही. या ठिकाणांची माहिती पुढील प्रमाणे…

हेही वाचाः ग्रामीण गोव्याच्या विकासावर विशेष भर!

लँड ऑफ मिडनाइटः नॉर्वे

नॉर्वे आर्क्टिक सर्कलमध्ये येतो. या देशाला लँड ऑफ मिडनाइट असंही म्हटलं जातं. इथे मे ते जुलै दरम्यान सुमारे 76 दिवस सूर्य मावळत नाही. नॉर्वेच्या स्वालबार्डमध्ये 10 एप्रिल ते 23 ऑगस्टपर्यंत सूर्याचा प्रकाश सतत असतो.

कॅनडामधील छोटंसं ‘नुनावत’

नुनावत हे कॅनडामधील एक छोटे शहर आहे. कॅनडाच्या या वायव्य भागात जवळजवळ दोन महिने सूर्याचा नेहमी प्रकाश असतो. तर हिवाळ्यात हे ठिकाणी सलग 30 दिवस पूर्णपणे रात्र असते.

युरोपमधील सर्वात मोठे बेट ‘आइसलँड’

‘आइसलँड’ हे ग्रेट ब्रिटननंतर हे युरोपमधील सर्वात मोठं बेट आहे. येथे जून महिन्यात सूर्यास्त होत नाही. याठिकाणी तुम्ही मध्यरात्रीसुद्धा सूर्यप्रकाशाचा आनंद घेऊ शकता.

बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर हिमनद्यांसाठी जगप्रसिद्ध ‘बॅरो, अलास्का’

बॅरो, अलास्का इथे मे महिन्याच्या उत्तरार्ध ते जुलैच्या अखेरीस सूर्य मावळत नाही. परंतु नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून, पुढील 30 दिवसांसाठी येथे रात्र होते. याला पोलर नाईट असेही म्हणतात. हे ठिकाण बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर हिमनद्यांसाठी जगप्रसिद्ध आहे.

हजारो तलाव आणि बेटांनी सजलेला ‘फिनलँड’

हजारो तलाव आणि बेटांनी सजलेला फिनलँड हा देश अतिशय सुंदर आहे. उन्हाळ्याच्या हंगामात सूर्याचा येथे सुमारे 73 दिवस प्रकाश असतो. याठिकाणी तुम्हाला नॉर्दर्न लाइट्सचा आनंद घेण्याची संधी मिळते. याशिवाय, तुम्ही फिनलँडमध्ये स्कीइंगला जाऊ शकता तसेच काचेच्या इग्लूमध्ये राहण्याचा अनुभव घेऊ शकता.

सूर्याचा सतत 6 महिने प्रकाश असणारंं ‘स्वीडन’

स्वीडन या ठिकाणी मे ते ऑगस्टपर्यंत सूर्य मध्यरात्री मावळतो आणि नंतर पहाटे 4:30 पर्यंत सूर्योदय होतो. येथे सूर्याचा 6 महिने सतत प्रकाश असतो. त्यामुळे लोक येथे अनेक दिवस गोल्फिंग, मासेमारी, ट्रेकिंग ट्रेल्स आणि अनेक साहसी उपक्रम करू शकतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!