काबूल विमानतळावर हल्लेखोर आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये चकमक

एक सैनिक ठार, तीन जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः काबूल विमानतळावर हल्लेखोर आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झालीय. या चकमकीत अफगाण सुरक्षा दलाचा एक सदस्य ठार झालाय, तर काबूल विमानतळावर अज्ञात हल्लेखोरांशी झालेल्या चकमकीत तीन सैनिक जखमी झालेत. जर्मनीच्या लष्कराने ट्विट करून ही माहिती दिलीय. जर्मन लष्कराने ट्विट करून म्हटलं आहे की, अमेरिकन आणि जर्मन फौजासुद्धा लढ्यात सहभागी आहेत आणि आमचे सर्व सैनिक सुरक्षित आहेत. हा हल्ला करणारे हल्लेखोर कोण आहेत, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, काही काळासाठी संशयाची सुई तालिबानकडे जात आहे, ज्याने काबूल विमानतळाला वेढा घातला आहे.

हेही वाचाः नव्या अवतारात रॉयल एनफील्ड क्लासिक 350 लाँचिंगसाठी सज्ज

अफगाणिस्तान सरकार पडल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण

युद्धग्रस्त देशाच्या राजधानीत असलेल्या विमानतळावर हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा ब्रिटिश लष्कराने रविवारी काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना चेंगराचेंगरी आणि गोळीबारात सात जण ठार झाल्याचे सांगितले. गेल्या रविवारी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी विमानतळाला घेराव घातला. त्याचबरोबर तालिबानचे पुनरागमन आणि अफगाणिस्तान सरकार पडल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हेच कारण आहे की, मोठ्या संख्येने लोक देश सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि यासाठी विमानतळावर पोहोचत आहेत.

अमेरिकन सैन्य माघारीची तारीख आणखी वाढवली जाऊ शकते

अमेरिका आणि त्याचे मित्र 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेत आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने सैन्य मागे घेण्याची 31 ऑगस्टची मुदत निश्चित केलीय. मात्र, सतत बदलत्या परिस्थितीचा विचार करता अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची तारीख आणखी वाढवता येऊ शकते. बायडेन यांनी रविवारी सांगितले की, आम्ही अमेरिकन लोकांच्या एका गटाला सुरक्षित आणि प्रभावीपणे बाहेर काढण्यासाठी काबूल विमानतळ कंपाऊंडमध्ये हलवले आहे. ज्या अमेरिकन लोकांना घरी परत यायचे आहे, त्यांना परत आणलंं जाईल, असंही बायडेन यांनी सांगितलं.

हेही वाचाः साखळीत ‘आरजी’च्या जनसंपर्क मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पंजशीरमध्ये 300 तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा अहमद मसूद यांचा दावा

पंजशीरमध्ये तालिबानविरोधातील योद्धांच्या नेतृत्व करत असलेल्या अहमद मसूद यांचे सैन्य युद्धासाठी सज्ज आहेत. नॅशनल रेजिस्टेंट फ्रंट म्हणजेच नॉर्दन अलायन्सचे नेतृत्व करत असलेल्या अहमद मसूद यांनी तालिबानला आव्हान दिलेय. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांना जोरदार टक्कर देत असलेल्या अहमद मसूद यांनी युद्धाची घोषणा केलीय. ज्यावेळी तालिबानने त्यांच्या हजारो दहशतवाद्यांना पंजशीरमध्ये पाठवत आहे. दरम्यान, मसूद यांनी 300 तालिबानी दहशतवाद्यांना मारल्याचा तसेच अनेकांना बंदी बनवल्याचा दावा केलाय.

हेही वाचाः मायलेकीने एकमेकींना बांधली राखी

निक्की हेलीचा जो बायडेनवर केला हल्ला

अमेरिकन नेत्या आणि संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनीसुद्धा जो बायडेन यांच्यावर हल्लाबोल केलाय. अमेरिका तालिबानला पूर्णपणे शरण गेलेय. अफगाणिस्तानमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी जो बायडेन स्वतः जबाबदार आहेत, असंही रिपब्लिकन पक्षातून आलेल्या निक्की हेली म्हणाल्यात. ‘ही एक अविश्वसनीय घटना आहे, जिथे तालिबान अमेरिकन नागरिकांना ओलिस ठेवत आहेत. आम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की, आम्ही आमच्या मित्रांसोबत आहोत. आपण आपल्या नागरिकांना आणि आपल्या मित्रांना बाहेर काढण्याचा मार्ग शोधला पाहिजे.

हा व्हिडिओ पहाः BABU KAVLEKAR | बाबु कवळेकरांचं धक्कादायक विधान, व्हिडीयो व्हायरल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!