बाप रे! आता माणसांनाही बर्ड फ्लूची लागण

रशियात एच-५ एन-८ स्ट्रेनची सात जणांना लागण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः बर्ड फ्लू हा आजार फक्त पक्ष्यांनाच होत असून त्याचा माणसांना कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, आता बर्ड फ्लूची लागण मनुष्यालाही होत असल्याचं आढळून आलं आहे. रशियात सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. हे सातही जण पोल्ट्रीमध्ये कार्यरत होते. या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही ट्रेस केलं जात आहे.

मानवी शरीरात बर्ड फ्लू आढळण्याची पहिलीच वेळ

मानवी शरीरात बर्ड फ्लू आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशियाच्या संशोधकांनी मानवी शरीरात एव्हियन एन्फ्लूएंजा ए व्हायरसचा एच-५ एन-८ स्ट्रेन दिसून आल्याचं स्पष्ट केलं आहे. रशियाच्या दक्षिणेकडील सात जणांना ही लागण झाली आहे, असं रशियाच्या व्हेक्टर रिसर्च सेंटरच्या संशोधक अन्ना पॉपोवा यांनी सांगितलं. गेल्या वर्षी 2020मध्ये रशियात बर्ड फ्लूचा कहर वाढला होता.

संक्रमितांच्या आरोग्याकडे संशोधकांची नजर

बर्ड फ्लू झालेले हे सातही रुग्ण स्वस्थ आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र, तरीही संशोधक आणि डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. या सातही जणांच्या शरीरात बर्ड फ्लूचा सौम्य व्हायरस आहे. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टर नजर ठेवून आहेत. या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सुदैवाने हे सातजण वगळता रशियात इतर ठिकाणी मानवी शरीरात बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आढळून आलेलं नाही.

हेही वाचाः FASTAG | नो फास्ट टॅग, भरा दुप्पट टोल

पक्ष्यांद्वारे बर्ड फ्लूची लागण

बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएंजा किंवा एव्हियन म्हटलं जातं. बर्ड फ्लूचा संसर्ग पक्ष्यांद्वारे होतो. आजारी पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने हा व्हायरस वाढतो. जिवंतच नाही तर मृत पक्ष्यांद्वारेही बर्ड फ्लूचा संसर्ग होतो. या फ्लूमध्ये एच-५ एन-८ किंवा एच-५ एन-१ व्हायरसचा फैलाव होतो. एच-५ एन-१ व्हायरस जुना आहे. तर एच-५ एन-८ हा नवा स्ट्रेन असून अधिक धोकादायक असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

लक्षणे काय? बचाव कसा करणार?

बर्ड फ्लूचा फैलाव कसा होतो? आणि त्यापासून बचाव कसा करायचा? असा सवाल नेहमीच केला जातो. कोणत्याही संक्रमित पक्ष्याचं मांस खाल्ल्याने किंवा या पक्ष्यांसोबत पाण्यात राहिल्यास बर्ड फ्लू होण्याची शक्यता आहे. बर्ड फ्लू हा श्वसनाशी संबंधित आजार असून त्यामुळे जीवही जाऊ शकतो. घसा खवखवणे, खोकला, न्युमोनिया, ताप, अंग दुखी आदी बर्ड फ्लूची लक्षणं आहेत. या आजारापासून बचाव करण्यासाठी संक्रमित पक्षांपासून अंतर ठेवून राहणं हाच त्यावरील उपाय आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!