#Nobel 2020 : चार्ल्स राईस, हार्वे अल्टर, मायकल ह्यूटन यांना वैद्यकशास्त्रात पुरस्कार

'हिपॅटायटिस-सी' विषाणूच्या शोधासाठी होणार सन्मान. रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांशी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी योगदान दिलं आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

स्टोकहोम : 2020 वर्षासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार चार्ल्स एम. राईस (Charles M. Rice), हार्वे जे. अल्टर (Harvey J. Alter) आणि मायकल ह्यूटन (Michael Houghton) यांना जाहीर झाला आहे. या तिघांना ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कार समितीने सोमवारी ही घोषणा केली.

नोबेल पुरस्कार समितीनं म्हटलं आहे की, या वैज्ञानिकांच्या योगदानामुळे प्रथमच, हिपॅटायटीस सी विषाणूंमुळे होणारे आजार बरे होऊ शकतात. या संशोधनामुळे यासंबंधीच्या आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येणे शक्य झाले असून लाखो लोकांचा जीव वाचविणारी नवीन औषधेही तयार केली गेली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!