चिंताजनक! कोरोनाच्या आणखी एका खतरनाक व्हेरीयन्टची धास्ती, लसही या व्हेरीयन्टसमोर निरुपयोगी?

कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : फक्त भारतातच नव्हे तर जगभर कोरोनाच्या संसर्गाचा धोका अजूनही टळलेला नाही. अशातच कोरोनाच्या आणखी एका नव्या व्हेरीएन्टची धास्ती घेतली जातेय. आरोग्य विषयक शास्त्रज्ञांनीही कोरोनाचा हा नवा व्हेरीयन्ट जास्त खरतनाक असल्याचं म्हटलंय. दक्षिण अफ्रिकेसह अनेक देशांत कोरोनाच्या या नव्या व्हेरीएन्टमुळे संसर्गात वाढ झाली असून रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनाही चकवून पुन्हा एकदा हा नवा कोरोना व्हेरीएन्ट संसर्ग वाढवत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Corona

चिंता वाढली!

आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यानुसार दक्षिण अफ्रिकेतील नॅशनल इंन्स्टिच्यूब फॉर कम्युनिकेबल डिजीज आणि क्वाजुलु नैटल रिसर्च इनोव्हेशन एन्ड सीक्वेसिंग प्लॅटफॉर्मवरील शास्त्रज्ञांनी धक्कादायक दावा केला आहे. कोरोनाचा सी.1.2 व्हेरिएन्ट मे महिन्यात आढळून आला होता. त्यानंतर ऑगस्टपर्यंत चीन, कॉन्गो, इंग्लंड, न्यूझीलंडसह स्वीत्झर्लंडमध्येही या व्हेरीएन्टच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ नोंदवण्यात आली आहे.

सी.1 वेरीएन्टच्या तुलनेत कोरोनाच्या या नव्या सी.1.2 या व्हेरीएन्टमध्ये अधिक बदल निदर्शनास आले आहेत. त्यामुळे या नव्यानं आढळलेल्या व्हेरीएन्टला व्हेरीएन्ट ऑफ इंट्रेस्ट श्रेणीत ठेवण्यात आल्याची माहिती मिळतेय.

हेही वाचा – SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

corona-1-1

दुप्पटीनं संसर्ग वाढण्याची भीती

जाणकारांनी केलेल्या अभ्यासानुसार, या नव्या व्हेरीएन्टमुळे कोरोनाचा अधिक वेगानं संसर्ग होण्याची भीती वर्तवली जातेय. या नव्या व्हेरीएन्टचा म्युटेशन रेट तब्बल 41.8 प्रति वर्ष नोंदवण्यात आला आहे. आताच्या संसर्गाहून हा वेग दुप्पट आहे. त्यामुळे या नव्या व्हेरीएन्टपुढे कोरोना लसही निरुपयोगी ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!