अजब गजब | एकाच वेळी दोन आणि तीन नव्हे, तर नऊ मुलांना दिला जन्म

आफ्रिकेच्या माली देशातील घटना; बाळांची तब्येत ठणठणीत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: एका वेळी जुळे, तिळे माहिती आहे. मात्र, आफ्रिकेतील एका महिलेने एकाच वेळी चक्क नऊ बाळांना जन्म दिला आहे. माली नावाच्या छोट्याशा देशातील या महिलेने मोरोक्कोमधील रुग्णालयात या नऊ बाळांना जन्म दिला. सर्व बाळांची तब्येत ठणठणीत असल्याचं खुद्द माली सरकारने सांगितलं आहे.

हेही वाचाः 2 अभियंते सस्पेंड! तर कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा

चाचण्यांमध्ये दिसली 7, पण दिला 9 बाळांना जन्म

पंचवीस वर्षांच्या या हलीमा सिसी नावाच्या महिलेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पश्चिम आफ्रिकेतील तिच्या मूळ शहरातून मोरोक्कोमधील एका चांगल्या रुग्णालयात 30 मार्चलाच नेण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चाचण्यांमध्येही महिला सात बाळांना जन्म देईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. एकाच वेळी सात बाळांना जन्म देणं हीसुद्धा मोठीच अपुर्वाई आहे. अशा स्थितीत या महिलेनं तब्बल नऊ बाळांना जन्म दिला आहे. मोरोक्कोचे आरोग्यमंत्री रिचर्ड कोऊधारी यांनी आपल्याला याबाबतची माहिती नसल्याचं म्हटलं असलं तरी मालीच्या आरोग्य मंत्र्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की या महिलेने पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला आहे. सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसूती करण्यात आली असून तिच्यासमवेत गेलेल्या मालीमधील डॉक्टरांकडून आपण तिच्या प्रकृतीसंबंधी माहिती घेत असल्याचं आरोग्यमंत्री फँटा सीबे यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!