अमेरिकेत गांधीच्या पुतळ्याची मोडतोड केल्यानंतर कुणी व्यक्त केला आनंद?

आज 30 जानेवारी, गांधीची पुण्यतिथी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एक ठिकाण आहे. या ठिकाणाचं नाव आहे डेव्हिस. या डेव्हिसमध्ये असलेल्या एका पार्कमध्ये महात्मा गांधीजींचा पुतळा होता. काही लोकांना तो मोडला. त्यामुळे आता तिथे आता तिथे राहणारे भारतीय-अमेरिकन लोक याबाबत संताप व्यक्त करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेचा निषेध केलाय.

डेव्हिस परिसरातील सेंट्रल पार्कमध्ये असलेला गांधींचा पुतळा 6 फूट उंच आणि सुमारे 300 किलो वजनाचा होता. 27 जानेवारी रोजी सकाळी पार्कमधील कर्मचार्‍यांना तो मोडलेल्या अवस्थेत आढळला. या पुतळ्याचा निम्मा चेहरा तुटलेला आहे. तुटलेला भागही गहाळ आहे. ही मूर्ती देखील चेहऱ्याजवळून मोडली आहे. नेमका हा सगळा धक्कादायक प्रकार कुणी केला, याचा शोध सुरु आहे.

डेव्हिस सिटी पोलिसांनी काय म्हटले?

डेव्हिस सिटी काउन्सिलचे सदस्य लुकास फेरेइच म्हणाले की, सध्या हा पुतळा काढून दुसर्‍या ठिकाणी ठेवला जात आहे. एका स्थानिक वृत्तपत्राने डेव्हिस पोलिस विभागाचे उपप्रमुख पॉल डोरोशोव्हो यांचा हवाला देत म्हटले आहे की,

हा पुतळा डेव्हिसमध्ये राहणाऱ्या काही लोकांसाठी सांस्कृतिक प्रतीक आहे, म्हणून आम्ही ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत आहोत.

शांतता आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या विध्वंसची भारत निंदा करतो, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताने अमेरिकी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यास सांगितले आहे.

सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी म्हणाले की,

महात्मा गांधींचा पुतळा तोडण्यात आला आहे. याचा पंतप्रधान मोदींनी तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले की हे अत्यंत चुकीचे आहे आणि त्याचा निषेध केला पाहिजे.

भारत सरकारने हा पुतळा सादर केला होता

गांधींचा पुतळा भारत सरकारने डेव्हिस शहराला दिला होता. गांधीविरोधी आणि भारतविरोधी संघटनांचा विरोध असूनही चार वर्षांपूर्वी सिटी कौन्सिलने सेंट्रल पार्कमध्ये हा पुतळा बसविला होता. या पुतळ्यास भारतीय अल्पसंख्यांक संघटनेने (ओएफएमआय) विरोध दर्शवत निदर्शनेही केली होती. मात्र डेव्हिसमध्ये गांधी पुतळा बसवावा की बसवू नये, यासाठी मतदान घेण्यात आलं आणि त्यानंतरच बहुमतानमुळे हा पुतळा डेव्हिसमध्ये बसवण्यात आला. तेव्हापासून ओएफएमआय येथून हा पुतळा हटवण्याची मागणी करत आहे.

भारतीय अमेरिकन लोकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनल (एफआयएसआय) शी संबंधित असणारे गौरंग देसाई म्हणाले की,

“बर्‍याच वर्षांपासून खलिस्तानी फुटीरतावादी आणि ओएफएमआय सारख्या संघटना भारत आणि हिंदू-फोबिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक भारतीय आयकॉनविरूद्ध केवळ द्वेष मोहीम राबवत नाहीत तर हिंदुफोबिया पसरवण्यासाठी आणि कॅलिफोर्नियाच्या पुस्तकांतून भारत काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. “

२०१६ मध्ये ओएफएमआयने एक मोहीम चालविली. या मोहिमेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये इयत्ता सहावी आणि आठवीच्या पुस्तकांतून भारत हा शब्द काढून टाकण्याची मागणी होत होती. ते म्हणाले की हा शब्द (भारत) च्या ऐवजी (दक्षिण आशिया) लिहिला गेला पाहिजे. या प्रकरणात, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. त्यानंतर कॅलिफोर्नियाच्या शिक्षण विभागाने कोणतेही बदल केले नाहीत.

गांधींची मुर्ती तुटल्यावर कोण आनंदी आहेत?

गांधींचा पुतळा तुटल्याच्या प्रकरणात हिंदू अमेरिकन फाउंडेशनने (एचएएफ) होमेट सिक्युरिटी डिपार्टमेंट (डीएचएस) आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) यांना हेट क्राइम अंतर्गत घटनेची चौकशी करण्यास सांगितले आहे. ट्विटरवर कॅलिफोर्नियामधील प्रो खलिस्तानी गटांनी गांधी पुतळा पाडल्याबद्दल आनंद व्यक्त करत फोटो शेअर केलेत.

अमेरिकेतील गांधी पुतळा तोडण्याची ही पहिलीच घटना नाहीये. डिसेंबर 2020 मध्ये खलिस्तानी समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये भारतीय दूतावासासमोर स्थापलेला गांधींचा पुतळाही तोडला होता.

ही घटना 28 जानेवारीची आहे, पण आज (30 जानेवारी) गांधींची पुण्यतिथी आहे. त्यादिवशी ही घटना समोर आली आहे. एकीकडे देशातील लोक महात्मा गांधींचे स्मरण करीत आहेत. त्यांना अभिवादन करत आहेत. तर दुसरीकडे महासत्ता असलेल्या देशात गांधीच्या पुतळ्याची विटंबना केल्यानं राग व्यक्त केला जातो आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!