काबुल हल्ला: स्फोटांमध्ये १०५ जणांचा मृत्यू, तर सुमारे १,१३८ जण जखमी

हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यातील मृतांची संख्या चढी

Goan Varta Live | प्रतिनिधी

काबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधल्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यातील मृतांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटांमध्ये १०५ जणांचा म़ृत्यू झाला आहे. तब्बल १,१३८ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यात १३ अमेरिकन जवानांचाही समावेश असल्याची बाब शुक्रवारी स्पष्ट झाली आहे.

हेही वाचाः बी. व्ही. नागरत्ना यांना पहिल्या सरन्यायाधीश होण्याची संधी

व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल

या सगळ्यातच विमानतळाजवळचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे. एका छोट्या ओढ्यात अडकलेले नागरिक एकमेकांना मदत करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या ओढ्यातलं पाणी मृतांच्या रक्तामुळे अगदी लाल झालं आहे. तसंच, या ओढ्यात मृतदेहांचा खच पडल्याचंही दिसून येत आहे.

प्रशासनच उरलं नसल्यामुळे मृतदेहांचं काय?

काबुल स्फोटात कित्येकांचे संपूर्ण कुटुंबच या हल्ल्यात मारली गेली. तसंच, विमानतळाजवळ कित्येक मृतदेह बेवारस आहेत. साधारणपणे बेवारस मृतदेहांवर प्रशासन अंत्यसंस्कार करते; मात्र अफगाणिस्तानमध्ये आता प्रशासनच उरलं नसल्यामुळे या मृतदेहांचं काय होईल, याची कोणालाच कल्पना नाही.

हेही वाचाः बाबूश यांच्या चालीची मडकईकरांकडून पुनरावृत्ती

उकाड्यापासून वाचण्यासाठी ओढ्याच्या पाण्यात उभे होते नागरिक

मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, काबूल विमानतळावर आश्रय घेतलेले नागरिक उकाड्यापासून वाचण्यासाठी या ओढ्याच्या पाण्यात उभे होते. तेवढ्यात एका हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात या सर्वांचा मृत्यू झाला आणि बघता बघता होत्याचं नव्हतं झालं. हे नागरिक या ठिकाणी विमानातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी थांबले होते. मात्र, त्यांना एम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्याची वेळ आली.

हेही वाचाः काँग्रेसची एका महिन्यात पुनर्रचना; प्रभारी दिनेश राव यांचा आदेश

गुरुवारी विमानतळाबाहेर दोन बॉम्बस्फोटांबरोबरच गोळीबाराचाही प्रकार

दरम्यान, गुरुवारी विमानतळाबाहेर दोन बॉम्बस्फोटांबरोबरच गोळीबाराचाही प्रकार घडला होता. घाईगडबडीने काबूलमधून बाहेर पडण्यासाठी विमानतळावर गर्दी केलेले अनेक जण यात बळी पडले आहेत. तेथे सुरक्षा बंदोबस्ताला असलेले अमेरिकन जवानही यात बळी पडल्याने अमेरिकेचे स्थानिक सुरक्षा अधिकारीही धास्तावलेले दिसून आले. ठार झालेल्यांमध्ये तालिबानचेही २८ जण आहेत, असं सांगण्यात येतं.

स्फोटातून वाचलेल्या व्यक्तीचा थरारक अनुभव

अमेरिकेच्या विशेष स्थलांतरित व्हिसासह आंतरराष्ट्रीय विकास गटाचे एक माजी कर्मचारी विमानतळाच्या एबी गेटजवळ रांगेत उभे होते. ते म्हणाले, सायं. ५ च्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. मला वाटले माझे कान फुटले आहेत, मला काहीच ऐकू येत नव्हतं. मी मृतदेह आणि शरीराचे अवयव हवेत प्लास्टिकच्या पिशव्याप्रमाणे उडताना पाहिले. मी बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी मृतदेह, शरीराचे अवयव, वृद्ध आणि जखमी पुरुष, महिला आणि मुलं पडलेली पाहिली. मी स्वतःच्या डोळ्याने हा विनाश पाहिला. असं म्हणत अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता असल्यानं ओळख उघड न करण्याची विनंती त्यांनी केली.   

हा व्हिडिओ पहाः GAMBLING | CRIME | क्राईम ब्रँचकडून कोलव्यात कारवाई

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!