गुगलच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न

गुगलविरोधात अमेरिकेचा अविश्वासाचा खटला

Goan Varta Live | प्रतिनिधी

न्यूयॉर्क : जगातील सर्वाधिक वापराचे सर्च इंजिन असलेल्या गुगलविरोधात (Google) अमेरिकेच्या न्याय विभागाने अखेर विश्वासघाताचा खटला दाखल केलाय. अमेरिकेत स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी हा खटला दाखल करण्यात आलाय.प्रतिस्पर्ध्यांना रोखून आपली मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी ऑनलाइन सर्च क्षेत्रातील आपल्या वर्चस्वाचा गैरवापर करीत असल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या न्याय विभागाने गुगलवर विश्वासघाताचा खटला दाखल केलाय. अल्फाबेट इन्कॉर्पोरेशनची उपकंपनी असणाऱ्या गुगलने ऑनलाइन शोध आणि जाहिरात क्षेत्रातील स्पर्धा कमी करून स्वत:चा नफा वाढवण्यासाठी आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप प्रदीर्घ काळापासून केला जातोय. गुगलच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी संरचनात्मक बदलांची आवश्यकता आहे, असे मत गुगलवर आरोप करणाऱ्यांनी व्यक्त केलंय.

हा खटला वॉशिंग्टन डीसी येथील फेडरल न्यायालयात दाखल झालाय. बाजारपेठेतील स्पर्धेचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकी सरकारने २० वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टविरुद्ध खटला दाखल केलेला. अमेरिकी सरकारने ऍपल, ऍमेझॉन आणि फेसबुक अशा दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांची न्याय विभाग व फेडरल ट्रेड कमिशनमार्फत चौकशी सुरू करून अँटिट्रस्ट कारवाई सुरू केलीये . ब्राउझरवरील गुगल हेच डीफॉल्ट सर्च इंजिन आहे याची यूजर्सना खात्री पटवून देण्यासाठी गुगल जाहिरातदारांकडून गोळा केलेले अब्जावधी डॉलर्स फोन निर्मात्यांना देत असल्याचा दोषारोपदेखील या खटल्यात केला असल्याची माहिती समोर येतेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!