Indonesia: इंडोनेशिया ‘हादरलं’, फुटबॉल सामन्यावेळी चेंगराचेंगरीत १२९ जणांचा मृत्यू, पहा ‘हा’ व्हिडीओ

फुटबॉल लीग सामन्यात गोंधळ आणि हिंसाचारानंतर चेंगराचेंगरी

रजत सावंत | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२९ जणांचा मृत्यू झाला असून, १८० जण जखमी झाले आहेत. काल रात्री झालेल्या इंडोनेशियन फुटबॉल लीग सामन्यात गोंधळ आणि हिंसाचारानंतर चेंगराचेंगरीत ही घटना घडली.
हेही वाचाःCrime Update | नागवा-हडफडे येथे युवकावर खुनी हल्ला प्रकरणी तिघांना अटक…

पर्सेबाया सुराबाय संघाने सामना जिंकला

अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय यांच्यादरम्यान सामना रंगला होता. सामन्यात पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करत ३-२ ने सामना जिंकला. सामना गमावलेल्या अरेमा एफसी संघाचे समर्थक मैदानात घुसले व गोंधळ घातला.
हेही वाचाःUPDATES | दुपारच्या ठळक घडामोडी…

सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित

यावेळी त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना आश्रू धुराच्या कांड्याचा वापर करावा लागला, त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२९ जणांचा मृत्यू झाला असून, १८० जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.
हेही वाचाःसरकारचा गोमंतकीयांना झटका; पाणी बिलात ‘वाढ’…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!