छे.. छे.. कोरोना वुहानमधून आलाच नाही!- जागतिक आरोग्य संघटना

१ महिना चीनमध्ये अभ्यास केल्यानंतर माहिती

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोना विषाणू नेमका आला कुठून? या प्रश्नाचं उत्तर ठोसपणे अजूनही दिलं जात नाही आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत तपास सुरु करण्यात आपला अभ्यास चीनपर्यंत नेला होता. मात्र चीनमध्ये याबाबत अभ्यास केल्यानंतर एक महत्त्वाची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं आहे.

पुराव्यांचा अभाव

चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक हा चीनमधून झाला असावा, असाच अंदाज सगळेजण बांधत होते. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं समोर आणलेल्या अभ्यासातून अशा पद्धतीचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. कोरोनाचा फैलाव हा वुहानच्या प्रयोगशाळेतूनच झाला असावा आणि तो जगभरात पसरला असावा, असाही तर्क लावला जात होता. मात्र तसे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. डिसेंबर २०१९आधी चीनमधील लोकांना कोणताही संसर्ग झाल्याचे संकेत नाहीत.

हेही वाचा – तुम्ही वापरत असलेला कॉन्डम आधीच वापरलेला असू शकतो!

संशयाचे ढग

इतकंच नाही तर त्याआधी शहरात कोरोना फैलाव झाल्याचेही कोणते पुरावे आढळलेले नाहीत, असंही जागतिक आरोग्य संघटना आणि चिनी तज्ज्ञांच्या प्रमुखांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मग नेमका कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, आणि तो पसरला कसा, यावरही संशयाचे ढग जमा झालेत.

Corona Covid 19 India Tally

जागतिक आरोग्य संघटनेचे बेन एम्ब्रेक म्हणाले की..

वुहानमधील तपासात करोनासंबंधी अनेक नव्या गोष्टी समोर आल्या. मात्र मोठा बदल झालेला नाही. डिसेंबर २०१९ मध्ये वुहान मार्केटबाहेर प्रसार झाल्याचे पुरावे सापडलेत. दरम्यान वुहान किंवा इतर कुठेही डिसेंबर २०१९ पूर्वी करोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचा पुरावा पथकाला सापडला नाही.

मग आला कुठून?

जागतिक आरोग्य संघटनेचं १४ जणांचं पथक चौकशी जवळपास एक महिना चीनमध्ये होतं. वुहानमध्ये कोल्ड चेनमधील उत्पादन असलेल्या ऑस्ट्रेलियन बीफमुळे करोना फैलावला असू शकतो अशी शक्यता या पथकाने व्यक्त केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. याआधी चीननेदेखील करोनाचे मूळ उगमस्रोत चीनमध्ये नसून इतर देशात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनाही चीनच्या सुरात सर मिळवत असल्याची टीकाही केली जाते आहे. एखादा विषाणू वाहक प्रजातीच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात शिरला आणि त्याचा प्रसार झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात अनेकांना लागण होऊन कोट्यवधी लोक मृत्यूमुखी पडले. तर अनेकांना कोरोना बाधा झाल्यानंतर पुन्हा बरंही वाटलं होतं. २०२० या वर्षात संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं होतं. चीनमधल्या वूहान येथे कोविड १९ साथीची चौकशी करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींची चौकशीही आता पूर्ण झाली आहे.
वाहक प्राण्यांकडून ह्या विषाणूचा प्रसार माणसांकडे झाला असावा असे प्राथमिक तपासणीतून पुढे आल्याचे पथकाचे प्रमुख डॉक्टर पीटर बेन एमबरेक यांनी पत्रकार परिषदेत संगितलंय.

Corona 24 800X450

मात्र या बाबतीत अधिक तपासाची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. काही नवी माहिती पुढे आली असली तरी, वटवाघूळ हेच प्राथमिक वाहक असले तरी ते वूहानमध्येच होते, किंवा साठवलेल्या मांसातून त्यांची लागण माणसांना झाली, या निष्कर्षांचा अभ्यास व्हायला हवा, असंही डॉक्टर एमबरेक म्हणाले. या विषाणूचा प्रसार प्रयोगशाळेतून झालेला नाही, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा –

हा Video पाहिल्यानंतर तुम्ही पिझ्झा खाणं सोडून द्याल!

Video | एकीचं बळ! दरीत पडलेल्या ट्रकला वाचवण्यासाठी अख्खा गाव एकवटला

केबीसीमधील आजी आणि नातवाचा कोकणी संवाद तुम्ही पाहिला की नाही?

काय आहे स्वामित्व योजना? जाणून घ्या प्रॉपर्टी कार्डचा फायदा काय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!