GLOBAL VARTA | DOES MODI DESERVES ‘NOBEL PEACE PRIZE’? | नोबेल समितीच्या उपनेत्याने केले भारताचे कौतुक: म्हणाले- पंतप्रधान मोदी या पुरस्काराचे प्रबळ दावेदार

ऋषभ | प्रतिनिधी
पंतप्रधान मोदी आणि भारताच्या प्रयत्नांचे कौतुक करताना नोबेल समितीचे उपनेते असल तोजे यांनी गुरुवारी सांगितले की, जगाला आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा हस्तक्षेपांची गरज आहे. ते म्हणाले, ‘भारताने कोणालाही धमकावले नाही, केवळ मैत्रीपूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडली. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला त्याची अधिक गरज आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असल्याचेही त्यांनी सांगितले. असल तोजे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना ज्या पद्धतीने युद्धाबाबत समजावून सांगितले, ते कौतुकास्पद आहे. त्यांनी कोणतीही धमकी न देता अणुयुद्धाचे परिणाम सर्व जगाला समजावून सांगितले आहेत . आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा नेत्यांची गरज आहे.
असल तोजे अजून काय म्हणाले ?
आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा मध्यस्थीची जगाला अधिक गरज असल्याचे त्यांनी गुरुवारी सांगितले. ते म्हणाले, ‘भारताने मुजोरी केली नाही, कोणालाही धमकावले नाही, केवळ मैत्रीपूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडली. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला त्याची अधिक गरज आहे.
मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार आहेत. पीएम मोदींच्या कारभाराचे कौतुक करताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या धोरणामुळे भारत एक समृद्ध आणि शक्तिशाली देश बनत आहे.
अस्सल तोजे भारत दौऱ्यावर आहेत. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना ते म्हणाले की, भारत महासत्ता बनणार आहे. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदी हे सर्वात विश्वासू नेते आहेत आणि तेच शांतता प्रस्थापित करू शकतात.