परदेशी गुंतवणुकीत लक्षणीय वाढ, सिंगापूर, अमेरिका आणि मॉरिशसची भारतात लक्षणीय गुंतवणूक

तब्बल 10 टक्क्यांनी जास्त परदेशी गुंतवणूक

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूक सुलभता आणि व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशात केल्या गेलेल्या परदेशी गुंतवणूकीत मोठी वाढ झाली आहे. जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांनी पहिली पसंती भारताला दिल्याचे समोर आलं आहे.

गेल्यावर्षीपेक्षा जास्त गुंतवणूक

2020-21 या वर्षात भारतामध्ये आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे 81.72 अब्ज अमेरिकन डॉलर्स थेट परदेशी गुंतवणूक (FDI) करण्यात आली असून हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा म्हणजे आर्थिक वर्ष 2019-20 मधील 74.39 अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणूकीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे. कंपनी भागभांडवलात आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये झालेली थेट परदेशी गुंतवणूक (FDI) (59.64 अब्ज अमेरिकन डॉलर्स) ही गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 19 टक्क्यांनी वाढली आहे. (49.98 अब्ज अमेरिकन डॉलर्स)

money

हेही वाचा : मोठी बातमी! बारावीसाठी दीड तासाची परीक्षा होण्याची शक्यता

कोणते देशांची भारताला पसंती?

आर्थिक वर्ष 2020-21 साठी या परदेशी गुंतवणूकदारांमध्ये प्रथम क्रमांकावर सिंगापूर (29%), दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका (23%), आणि तिसऱ्या क्रमांकावर मॉरिशस (9%) आहे. आर्थिक वर्ष 2020-21मध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर व सॉफ्टवेअर च्या क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक झाली असून भागभांडवलातील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 44% गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे. त्याखालोखाल बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्रात 13 % व त्यानंतर सेवाक्षेत्रात 8% इतकी गुंतवणूक झाली आहे.

गुजरातमध्ये सर्वाधिक गुंतवणूक

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीत गुजरातचा 78%, कर्नाटकचा 9% आणि दिल्लीचा 5% वाटा आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात भागभांडवलात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी गुजरात ला सर्वात जास्त म्हणजे 37%, त्याखालोखाल महाराष्ट्राला 27% व कर्नाटकला 13% गुंतवणूक प्राप्त झाली. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गुजरातला प्राप्त झालेल्या भागभांडवलात सर्वाधिक वाटा (94%) कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात असून बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्रात 2% इतका वाटा होता.

हेही वाचा : औषध उत्पादन-पुरवठा प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा दर्जा

कोणत्या क्षेत्रात चलती?

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21 या आर्थिक वर्षात बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्र, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्र, रबरी वस्तू, किरकोळ बाजारपेठ, औषधे व विद्युत उपकरणे या क्षेत्रातील गुंतवणूक 100 टक्क्यांनी वाढली आहे. सर्वात मोठ्या 10 परदेशी गुंतवणूकदारांमध्ये सौदी अरेबिया पहिल्या स्थानावर आहे. गेल्या आर्थिक वर्षातील 89.93 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स च्या तुलनेत या 2020-21 च्या आर्थिक वर्षामध्ये सौदी अरेबियाने 2816.08 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ची गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अमेरिकेने केलेल्या गुंतवणुकीत 227 टक्क्यांची तर इंग्लंड ने केलेल्या गुंतवणुकीत 44 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

हेही वाचा : आता लसीकरण केंद्रावरही होणार नोंदणी !

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!