लाँगमार्च 5 बी उपग्रह पृथ्वीवर आदळण्याचा धोका

जगाला चीनचा ताप; अवकाशातील रॉकेटवरील नियंत्रण सुटलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः चीनकडून काही दिवसांपूर्वी अंतराळात पाठविलेल्या रॉकेटवरील नियंत्रण सुटल्याचं वृत्त आहे. त्यामुळे जगासमोर नवी समस्या उभी ठाकली आहे. चीनने पाठवलेलं लाँगमार्च ५ बी हे रॉकेट पृथ्वीवर कोठेही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत हे रॉकेट कोसळू शकेल. मात्र, ते कोणत्या ठिकाणी पडेल, याची धास्ती अवघ्या जगाला आहे. बेलिंग्टन, न्यूयॉर्क, दक्षिण चिली, माद्रिद किंवा बीजिंग यापैकी कोणत्याही ठिकाणी रॉकेट कोसळू शकतं, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अमेरिकेला आव्हान देण्यासाठी केलं रॉकेट लॉन्च

चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने काही दिवसांपूर्वीच २१ टन वजनाचं लाँगमार्च ५ या श्रेणीतील राकेट लाँच केलं होतं. चीनसे अमेरिकेला आव्हान देत स्वतःचं अंतराळ स्थानक विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अंतराळात स्थानक उभारण्याच्या या प्रयत्नाचा भाग म्हणून हे रॉकेट अवकाशात पाठविण्यात आलं. पूर्व नियोजनानुसार, हे रॉकेट समुदात कोसळणार होतं. त्या आधीच त्यावरील नियंत्रण सुटलं आहे.

किटवरील नियंत्रण सुटलं

चीनने उभारलेलं हे अंतराळ स्थानक सात वर्षांनंतर कार्यान्वित होणार आहे. चीनमधील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, साधारणतः १५ वर्षं हे स्थानक टिकू शकतं. या मल्टिमॉडेल स्पेस स्टेशनमध्ये अंतराळ कॅप्सूल आणि दोन प्रयोगशाळा आहेत. सुमारे ४० मेट्रिक टन वजनाचं हे अंतराळ स्थानक असेल. किटवरील नियंत्रण सुटल्यानं एकप्रकारे चीनच्या अवकाश संशोधन पद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!