Corona Update | आश्चर्य! पोलिसाने थेट पंतप्रधानांनाच ठोठावला दंड!

कोविड नियम मोडणं पडलं महागात; नॉर्वेच्या पंतप्रधानांना दीड लाखाचा दंड

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशात करोनाचा संसर्ग फैलावत असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून गर्दी जमवली जात असल्याचं चित्र दिसतंय. यामध्ये महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींचा समावेश आहे. मात्र, भारताबाहेर काहीसं वेगळं चित्र आहे. लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी चक्क पंतप्रधानांनाच दंड ठोठावण्यात आला असल्याचं समोर आलंय.

थेट पंतप्रधानांनाच ठोठावला दंड!

करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउन लागू केलाय. त्याशिवाय भारतासह काही देशांमध्ये करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्याबाबतचे नियम सक्तीचे केलेत. मात्र, अनेकजण या नियमांची पायमल्ली करत असल्याचं दिसून येतंय. मात्र, लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी चक्क पंतप्रधानांनाच पोलिसांनी दंड ठोठावलाय.

हेही वाचाः करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस

थोडा थोडका नाही, तब्बल १ लाख ७५ हजारांचा दंड!

नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी फेब्रुवारी महिन्यात आपला ६० वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी एका छोटेखानी पार्टीमध्ये १३ जण उपस्थित होते. मात्र, नियमांनुसार १० जणांना परवानगी देण्यात आली होती. सोलबर्ग यांना २० हजार नॉर्वे क्राउन्स म्हणजे जवळपास एक लाख ७५ हजार दंड ठोठावण्यात आलाय. पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीये. पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी एका माउंटन रिसॉर्टवर पार्टी आयोजित केली होती. त्यावरून त्यांच्यावर देशभरातून टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली. त्या दरम्यान नॉर्वेत १० हून अधिकजणांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आलीये. साधारणपणे अशा प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई केली जात नाही. मात्र, पंतप्रधान या लॉकडाउनचा निर्णय घेणाऱ्या सरकारच्या प्रमुख आहेत. त्यांनीच नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हा दंड वसूल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

पंतप्रधानांनी दिलगिरी व्यक्त केली 

रॉयटर्सच्या वृत्तानुसार पंतप्रधान कार्यालयाने अद्याप या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कुटुंबातील 13 सदस्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. देशात 10 हून अधिक लोकांच्या मेळाव्यास सरकारने बंदी घातलीये. सर्वांसाठी कायदा समान असून कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पंतप्रधानांनी देशाची माफी मागितली असून दंड भरण्याची तयारी दर्शवलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!