CONTROVERSY OVER MAP IN SCO | ”काश्मीरचा योग्य नकाशा दाखवा, अन्यथा…”, भारतानं पाकिस्तानला शांघाय शिखर परिषदेतून दाखवला बाहेरचा रस्ता

 पाकिस्ताननं पुन्हा एकदा काशमीरचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. यावर भारताने तीव्र विरोध दर्शवत पाकला शांघाय शिखर परिषदेतून (SCO) बाहेरचा रस्ता दाखवला.

ऋषभ | प्रतिनिधी

पाकिस्तान (Pakistan) आपला कारस्थानीपणा काही सोडण्याचं नाव घेत नाहीय. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा चुकीचा नकाशा दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, भारताने याला तीव्र विरोध दर्शवला. काश्मीरचा चुकीचा नकाशा दाखवल्यामुळे भारताने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीतून पाकिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मंगळवारी झालेल्या SCO बैठकीत पाकिस्तानने भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या नकाशात जम्मू-काश्मीर चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं होतं. यावर कठोर भूमिका घेत भारताने पाकिस्तानला नकाशा दुरुस्त करावा अन्यथा बैठकीपासून दूर राहावे, असे सांगितलं. 

पाकिस्तानने काश्मीरचा चुकीचा नकाशा दाखवला

”काश्मीरचा योग्य नकाशा दाखवा…” म्हणत भारतानं पाकिस्तानला शिखर परिषदेतून बाहेरचा रस्ता दाखवला. भारताने स्पष्टपणे सांगितलं की, काश्मीरचा योग्य नकाशा दाखवा अन्यथा परिषदेत सामील होता येणार नाही. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) अंतर्गत भारताने आयोजित केलेल्या लष्करी वैद्यकीय तज्ज्ञांच्या परिषदेत पाकिस्तानने काश्मीरचा चुकीचा नकाशा दाखवला. भारत सध्या SCO चा अध्यक्ष आहे आणि अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.

परिषदेतून भारतानं पाकिस्तानला दाखवला बाहेरचा रस्ता

पाकिस्तान चूक सुधारणार नसेल तर, पाकिस्तानला लष्करी औषध, आरोग्य सेवा आणि साथीच्या आजारांमध्ये (SCO) सशस्त्र दलांच्या योगदानावर आयोजित शांघाय शिखर परिषदेत सहभागी होता येणार नाही अशी भूमिका भारताने घेतली. दरम्यान, पाकिस्तानच्या भूमिकेवर भारताने आक्षेप घेतल्यानंतर पाकिस्तानने पुनः परिषदेत सहभाग घेतला नाही.

सशस्त्र दलांचे साथीच्या आजारांमध्ये योगदान

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) अंतर्गत होणारी ही बैठक इन्स्टिटयूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अॅनॅलिसिस (IDSA) या भारतीय थिंक टँकने आयोजित केली होती. सशस्त्र दलांचे लष्करी औषध, आरोग्यसेवा आणि साथीच्या आजारांमध्ये योगदान ही या बैठकीची थीम होती. या बैठकीत पाकिस्तानचे शिष्टमंडळही सहभागी होणार होते. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानच्या नकाशावर आक्षेप घेतल्यानंतर पाकिस्तानने बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रभावीपणे निमंत्रण मागे घेतल्यामुळे पाकिस्तान बैठकीला उपस्थित राहू शकला नाही, असा दावा पाकिस्ताननं केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!