तुम्ही वापरत असलेला कॉन्डम आधीच वापरलेला असू शकतो!

वापरलेले कॉन्डम हजारोंच्या संख्येनं बाजारात पुन्हा विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : करोना काळात (Covid-19) आरोग्यासंबंधी सगळेच जागरुक झाले आहेत. मात्र या सगळ्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईसह हैदराबाद (Navi Mumbai, Hydrabad) आणि औरंगाबादेत (Aurangabad) वापलेल्या हॅन्डग्लोव्जची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला होता. अशातच आता वापरलेल्या कॉन्डमचीही (Used Condom) पुन्हा विक्री होत असल्याचं समोर आलं आहे.

कुठे झाली वापरलेल्या कॉन्डमची विक्री?
व्हिएतनाममध्ये एका माणसाला कॉन्डमने भरलेली बॅग सापडली. या बॅगमधले सगळे कॉन्डम वापरलेले होते. मात्र ज्या माणसाला ही बॅग सापडली, त्यानं या बॅगमधले कॉन्डम कपडे धुवावेत, त्याप्रमाणे धुतले आणि त्याची पुन्हा विक्री केली. हा सगळा प्रकार व्हिएतनाम पोलिसांना लक्षात येताच, त्यांनी तातडीनं कारवाई केली.

व्हिएतनाम पोलिसांनी (Vietnam Police) एका फॅक्ट्रीमधून वापरलेल्या कॉन्डमची विक्री होत असल्याचं छापेमारीतून उघड केलंय. रॉयटर्सने यासंबंधीचं वृत्त दिलंय. व्हिएतनामधील टीव्ही माध्यमांमध्ये संबंधीत व्हिडीओदेखील समोर आलेत. व्हिएतनामच्या बिन डॉन्ग प्रांतातील मिन्ह सिटी या ठिकाणी असलेल्या एका गोदामामध्ये मोठ्या संख्येने धुऊन ठेवलेल्या कॉन्डमचा साठा जप्त करण्यात आला आहे.

नेमके किती कॉन्डम होते?
पोलिसांनी केलेल्या छापेमारीत तब्बल 3.50 लाख कॉन्डमचा साठा जप्त करण्यात आला. डझनभर गोण्यांमध्ये हा साठा ठेवण्यात आला होता. यातील एका गोणीचं वजन जवळपास 360 किलो असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

कशी केली जायची विक्री?
गोदाम मालकाने नेमके वापरलेले कॉन्डम कसे पुन्हा वापरले जात होते, याचाही किस्सा सांगितला आहे. एक अज्ञात व्यक्ती दर महिन्याला वापरलेले क़़ॉन्डम गोदामात एका गोणीत किंवा बॅगमध्ये आणून सोडायचा. त्यानंतर वापरलेले कॉन्डम गरम पाण्यात टाकले जायचे. उकळत्या पाण्यात टाकलेले कॉन्डम त्यानंतर वाळत घातले जायचे. यानंतर खरं काम सुरु व्हायचं, ते गोदामातील मजुरांचं. मजुरांना या कॉन्डम्सला साफ करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर हे कॉन्डम पुन्हा विकण्यासाठी व्यवस्थित पॅक केले जायचे. अटक करण्यात आलेल्या एका महिलेने सांगितलेल्या माहितीनुसार, असे हजारो कॉन्डम याआधीच विक्रीसाठी बाजारात पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.

आता काय काळजी घ्यावी?
व्हिएतनाममधील कॉन्डमचं हे रॅकेट जगभरात पसरलं असण्याची शंका व्यक्त केली जाते आहे. वापरलेले कॉन्डम पुन्हा वापरणं जीवघेणं ठरु शकतं. एड्ससारखा महाभयंकर आजार वापरलेला कॉन्डम पुन्हा वापरल्यानं होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात कॉन्डम खरेदी करताना त्याचा ब्रॅन्ड, पॅकींग, ISI मार्क, इत्यादी बाबी नक्की पडताळून घ्या. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं, केव्हाही चांगलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!