अजब गजब । अवघ्या 28 तासांत उभी केली दहा मजली इमारत!

'प्री - फॅब्रिकेटेड कन्स्ट्रक्शन सिस्टीम्स'मुळे घडली किमया

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: एखादी बहुमजली इमारत उभी करणं हे सहजसोपं आणि कमी वेळेत होणारं काम नाही. त्यासाठी अनेक महिने लागू शकतात. मात्र, चीनमधील चांगशा शहरात अवघ्या २८ तास आणि ४५ मिनिटांमध्ये दहा मजली इमारत उभी करण्याची किमया करण्यात आली. ही इमारत उभी करणाऱ्या ‘ब्रॉड ग्रुप’ने याबाबतचा पाच मिनिटांचा व्हिडीओ यू-ट्यूबवर शेअर केला आहे. त्यामध्ये ही इमारत कशी उभी केली हे दाखवले आहे.

‘प्री – फॅब्रिकेटेड कन्स्ट्रक्शन सिस्टीम्स’मुळे घडली किमया

ही किमया घडली ती ‘प्री – फॅब्रिकेटेड कन्स्ट्रक्शन सिस्टीम्स’मुळे. या इमारतीचे काही आवश्यक भाग आधीच डिझाईन करून तयार केलेले असतात. ते बांधकामावेळी योग्य ठिकाणी ठेवण्याचंच काम शिल्लक असतं. ‘ब्रॉड ग्रुप’च्या फॅक्टरीत एखाद्या मोठ्या कंटेनरसारखे दिसणारे बिल्डिंगचे मोड्यूल्स बनवले जातात. ते ट्रकमधून बांधकामाच्या ठिकाणी आणून त्यांचा गरजेप्रमाणे साठा केला जातो. हे इमारतीचे वेगवेगळे भाग प्रत्यक्ष बांधकामावेळी एकमेकांना बोल्टस्ने जोडले जातात आणि त्याचे रूपांतर पूर्ण बांधकाम झालेल्या इमारतीत होतं, शेवटी वीज आणि पाण्याचे कनेक्शन जोडलं जातं.

अशी ही प्रक्रिया आहे

ब्रॉड ग्रुपने म्हटलं आहे की ‘कंटेनरच्या आकाराचे भाग करणं, जगभरात कुठेही कमी खर्चात वाहतूक करून नेणं आणि शेवटी बांधकामाच्या ठिकाणी अत्यंत सुलभपणे एकमेकांना जोडून इमारत उभं करणं अशी ही प्रक्रिया आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!