का गायब होताहेत फ्रान्सचे प्रॉडक्ट्स? जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचाच…

जगभरातील इस्लामी देशांतही ट्रेंडिंग, फ्रान्सच्या समर्थनार्थ अनेक सरसावले

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरोः जगातील काही प्रमुख इस्लामिक देशांतील सुपर स्टोअर्सच्या शेल्फमधून फ्रान्सची उत्पादनं अचानकपणं गायब होत आहेत. कतार, कुवेत, टर्की म्हणजेच तुर्कस्तान, पाकिस्तान तसंच अरब राष्ट्रांपैकी अनेक देशांचा यात समावेश आहे. #boycottfrance आणि #boycottfrenchproducts सध्या ट्विटरवर ट्रेंडिंग आहे. काय आहे हा प्रकार जाणून घेऊया…

काय आहे प्रकार


फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन यांनी इस्लामविरोधी वक्तव्य केल्यानं तसंच महम्मद पैगंबर यांचा अपमान केल्याचा दावा करत जगभरातील कट्टर मुसलमानांनी फ्रेंच उत्पादनं नाकारण्याचं म्हणजेच बॅन करण्याचं आवाहन केलं. याला अनुसरून अनेक इस्लामी देशातील मॉल्स, सुपर स्टोअर्समधून फ्रान्सचे प्रॉडक्टस् मागं घेण्यात आलेय. इतर देशांनी तसंच मुस्लीम बांधवांनी या उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावरून केली जातेय.

फ्रान्स सरकारची प्रतिक्रिया


जगभरातून केल्या जात असलेल्या आवाहनानंतर फ्रान्स सरकारनं अधिकृत प्रतिक्रिया जारी केलीय. शांततेसाठी आम्ही सर्वांचा आदर करतो, मात्र द्वेष (hate speech) आम्हाला मान्य नाहीए. जागतिक मूल्यांच्या बाजूनं आम्ही नेहमी उभे राहणार, असंही फ्रान्सनं स्पष्ट केलंय.

राष्ट्राध्यक्षांचं म्हणणं काय आहे


हा बॉयकॉटचा प्रकार तथ्यहीन असल्याचं मत इमान्युएल मॅक्रॉन यांनी व्यक्त केलंय. आमच्या देशावरील हल्ले तत्काळ थांबले पाहिजेत. यामागं कट्टर अल्पसंख्याक आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

बॉयकॉटपूर्वी काय घडलं


फ्रान्समध्ये महम्मद पैगंबर यांचं कार्टुन विद्यार्थ्यांना दाखवल्याबद्दल एका टीचरची गळा चिरून क्रूरपणं हत्या करण्यात आली. टीचरच्या एका स्टुडंटच्या वडिलांनीच हे कृत्य केलं. फ्रेंच पोलिसांच्या आवाहनानंतरही हत्या करणाऱ्या व्यक्तीनं समर्पणास नकार दिल्यानं त्याला गोळ्या झाडण्यात आल्या.

फ्रेंच नागरिकांची भूमिका


टीचरच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये कट्टरवादाच्या विरोधात वातावरण तापू लागलं. मॅक्रॉन यांच्या आदेशावरून देशभरातील सुमारे 80 समाजकंटकांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं ताब्यात घेण्यात आलं. कट्टरता आणि क्रूरता याविरोधात फ्रान्सच्या नागरिकांनी उघड भूमिका घेतल्यानं वादात आणखी भर पडलीय. यातच फ्रान्समधील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आल्याचं बोललं जातंय. याचीच परिणिती #boycottfrance हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होतोय आणि त्यामुळंच फ्रान्सची उत्पादनं शेल्फवरून गायब होतायत.

#WeSupportFrance सुद्धा ट्रेंडिंग

दरम्यान, फ्रान्सच्या सरकारनं केलेल्या कृतीलाही जगभरातून पाठिंबा मिळतोय. याचाच परिणाम म्हणून #WeSupportFrance हे हॅशटॅगही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. दहशतवादाविरोधात लढण्यात काय गैर आहे, बॉयकॉट का करायचा, असे प्रश्नही या हॅशटॅगसोबत विचारले जाताहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!