भीषण अग्नितांडव! टायर डम्पयार्डला लागलेल्या आगीची धग अंतराळातूनही दिसली

गेल्या चार दिवसांपासून ही आग धुमसतेय

Goan Varta Live | प्रतिनिधी

कुवेतच्या सुलैबिया शहरात जुन्या टायरच्या डम्पयार्डला आग लागली आहे. या यार्डमध्ये सुमारे ७० लाख टायर जमा करण्यात आले होते.

आगीमुळे येथील हवा अधिकच विषारी झाली आहे. या डम्पयार्डमध्ये याआधी देखील आग लागली होती. वाळवंटीय क्षेत्रामुळे धोका वाढला आहे. ही आग इतकी भयंकर आहे की ती उपग्रहांद्वारेही पाहिली गेली आहे.

जगातील सर्वात मोठ्या टायरच्या डम्पयार्डमध्ये विषारी धूर वाढत आहे. सहा एकरात पसरलेल्या या ठिकाणी आग लागल्यानंतर धूर निघत असल्याचे फोटो सॅटेलाईटमध्ये कैद झाले आहेत.

कुवेतने हे टायर इथे आणण्यासाठी पैसे दिले आहेत. या टायरची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी चार कंपन्यांना देण्यात आली आहे.

कुवेत सरकारने वाळवंटात टायरची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे. त्यातून पुनर्प्रक्रिया करता येतील असे ९५ टक्के टायर काढून टाकण्यात येतात.

५० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचणाऱ्या देशात असे ज्वलनशील पदार्थ साठवण्याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या टायर डम्पयार्डमध्ये गेल्या ४ दिवसांपासून आग धगधगत आहे. कुवेत आणि इतर काही देशांमधून आणलेले सुमारे ७० लाख जुने टायर येथे ठेवले आहेत. हा भाग अनेकदा वाळूची वादळे येत असतात, ज्यामुळे टायर वाळूने भरतात.

आगीमुळे अत्यंत विषारी धूर निघत आहे. जो पर्यावरण आणि आरोग्यासाठी धोकादायक आहे.

या समस्येमुळे सध्या कुवैतमध्ये चिंतेचे वातावरण आहे. टायर जाळल्याने कार्बन मोनोऑक्साइड आणि सल्फर ऑक्साईड सारखी रसायने बाहेर पडतात.

या रसायनांमुळे श्वसनाचे आजार आणि कर्करोगही होऊ शकतो. याशिवाय या विषारी धुरांचा प्रभाव बराच काळ टिकतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!