‘या’ आर्मी फोटोग्राफरने कॅमेऱ्यात टिपला स्वतःच्या मृत्यूचा क्षण

2013 सालची घटना; हिल्डा क्लेटन यांना आलं होतं अपघातात मरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः लष्कर कोणत्याची देशाचं असो, त्यात काम करणारे सैनिक हे मनुष्य आहेत, जसे आपण आहोत. सैनिकही आपल्यासारखे मनुष्य आहेत. त्यांनाही वेदना जाणवतात, त्यांनाही दुखतं खुपतं. त्यांचंही कुटुंब असतं. त्यांना झोप येते. प्रत्येक देशाचा सैनिक हा माणूस आहे. पण ही गोष्ट आपण समजण्यात कमी पडतो. हे वर्षं आहे 2013. जेव्हा एका फोटोग्राफरने एक छायाचित्र काढलं, ज्याने जगाला सांगितलं की एका सैनिकाचं आयुष्य कसं आहे. फोटोग्राफरने स्टोफाचं छायाचित्र काढलं, पण दुर्दैवाने फोटोग्राफरला स्फोटात मरण आलं.

हेही वाचाः पेडणे नगरसेविका रमल्या गणेशमूर्ती रंगकामात

अफगाणिस्तानी सैनिकांना युद्धभूमीवरील छायाचित्रण शिकवत असताना झालेल्या अपघाती स्फोटात अमेरिकी लष्करातील हिल्डा क्लेटन (वय २२) या महिला छायाचित्रकाराचा मृत्यू झाला. हा स्फोट होत असतानाचा फोटो त्यांनी कॅमेऱ्यात टिपला. क्लेटन यांच्या कुटुंबीयांच्या परवानगीनंतर अमेरिकी लष्कराने हे छायाचित्र प्रसिद्ध केले होते.

हिल्डा क्लेटन आणि चार अफगाण सैनिकांचा प्रशिक्षणादरम्यान २ जुलै २०१३ रोजी मृत्यू झाला होता. अफगाणिस्तानातील लागहाम प्रांतात सुरू असलेल्या स्फोटकांच्या प्रशिक्षणादरम्यान क्लेटन छायाचित्रे घेत होत्या. या वेळी क्लेटन यांच्यासह अफगाण सैनिकानेही हा क्षण कॅमेऱ्यात टीपला होता. अमेरिकी लष्काराने या सैनिकाने घेतलेले छायाचित्रही प्रसिद्ध केली होती. ‘मिलिट्री रिव्ह्यू’ या नियतकालिकात ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती.

हिल्डा क्लेटन मेरिलँड येथील ५५व्या सिग्नल कंपनीच्या फोर्ट मीडमध्ये कार्यरत होत्या. या विभागाला ‘कॉम्बॅट कॅमेरा’ म्हणूनही ओळखलं जातं. ‘कॉम्बॅट कॅमेरा’च्या सैनिकांना कोणत्याही वातावरणात छायाचित्रे आणि व्हिडिओ घेण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. युद्ध मोहिमांतील क्षणचित्रे टिपण्यासाठी इतर सैनिकांसोबत हे सैनिक जात असतात.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | SUSPENSE | स्कार्लेट प्रकरणाच्या स्मृती ताज्या

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!