अमेरिकेतील कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

60 हजार जणांवर प्रयोग : प्रसिद्ध जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जगातील कोट्यावधी लोक कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार यावर लक्ष ठेवून आहेत. प्रसिद्ध जॉन्सन अँड जॉन्सन (jonson and jonson) या कंपनीने कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. या लसीने चाचणीतील पहिले दोन टप्पे यशस्वीरित्या पार केले आहेत.

आता कोरोनावरील या लसीचा प्रयोग हा 60 हजार जणांवर केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी अमेरिकेसह जगातील 200 हून अधिक जागांची निवड करण्यात आली असून या ठिकाणचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.
‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ची कोरोना लस तिसऱ्या टप्प्यात पोहोचणारी अमेरिकेची चौथी लस ठरली आहे. तर जगभरातील दहावी कंपनी आहे. जर या चाचणीचे टप्पे पुढे भविष्यातही अशाचप्रकारे यशस्वी ठरले तर येत्या 2021 पर्यंत या लसीला परवानगी मिळू शकते असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ अॅलेक्स गोर्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आमची कंपनी जागतिक स्तरावर वैज्ञानिक नाविन्यांचा आधार घेत या आजारापासून मुक्त होण्यासाठी ही लस तयार करत आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून सर्व देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. सद्यस्थितीत जवळपास चार लसी तिसऱ्या टप्प्यात आहेत.
अमेरिकेकडून ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ला 1.45 अब्ज डॉलरचे फंडींगही दिले आहे. जॉन्सन अॅन्ड जॉन्सनची लस सर्दी-खोकल्यावर आधारित एडेनोवायरलच्या सिंगल डोसवर आधारित आहे. यामध्ये नव्या कोरोना व्हायरसच्या ‘स्पाईक प्रोटीन’चाही समावेश करण्यात आला. याचा एक डोस दिल्याने इम्युनिटी विकसित होऊ शकते, असा दावा केला जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!