‘एअर इंडिया’ युक्रेन मोहिमेसाठी सज्ज

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणार एअर इंडिया

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडिया सज्ज झाली आहे. एअर इंडिया युक्रेन मोहिमेवर जाणार असल्याची माहिती एअर इंडियानेच दिली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय दूतावासाकडून सूचना जारी करण्यात आली आहे. तसेच भारतही तेथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
हेही वाचाःइराणहून आणलेले ५० कोटींचे हेरॉईन जप्त

विमानांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू

अनेक भारतीय विद्यार्थी आणि इतर कारणांनी युक्रेनमध्ये दाखल असलेल्या भारतीय नागरिकांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. सुटकेसाठी प्रत्येक जण भारताच्या विमानांची वाट पाहत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडिया सज्ज झाली आहे. दरम्यान, युक्रेन आणि भारत या दरम्यान विमानांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचाःभाजपची ‘बॅलट’ मतदानासाठी दहा हजारांची ऑफर

मायदेशात आणण्यासाठी ३ विमाने पाठवणार

युक्रेनमधील भारतीय दूतावासात भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयही युक्रेनमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबीयांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. एअर इंडिया युक्रेनमधील भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी ३ विमाने पाठवणार आहे. भारत-युक्रेन दरम्यान एअर इंडियाची ही तीन विमाने २२ फेब्रुवारी, २४ फेब्रुवारी आणि २६ फेब्रुवारी रोजी उड्डाण करतील. यासाठी एअर इंडियाने बुकिंग सुरू केले आहे. एअर इंडियाची कार्यालये, वेबसाइट, कॉल सेंटर्स आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंटकडून बुकिंग करता येईल, असे एअर इंडियाने म्हटले आहे.
हेही वाचाःमुख्यमंत्रिपदावर मगोपचा ‘डोळा’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!