जगात पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या लसींच्या कॉकटेलवर अभ्यास

Sputnik V आणि AstraZeneca ची लस दिली एकत्र, जाणून घ्या परिणाम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोना व्हायरसपासून संरक्षण मिळवण्यासाठी एकाच लसीचे दोन डोस दिले जात आहेत. काही ठिकाणी आता तिसरा बुस्टर डोस देण्यासही सुरुवात झाली आहे. याआधी असा समज होता की, दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेतल्यानंतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. स्पुतनिक व्ही लसीचे मुख्य समर्थक रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) ने दोन लसींच्या संयोजनाच्या वापराबाबत अझरबैजानमध्ये आयोजित केलेल्या जगातील पहिल्या अभ्यासाचे सुरक्षा परिणाम जाहीर केले.

हेही वाचाः महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी संशयितास अटक

लसींचे कॉकटेलचे कोणतेही वाईट किंवा गंभीर परिणाम दिसले नाहीत

स्पुतनिक व्ही लस आणि एस्ट्राझेनेका लसीच्या संयोगाची सुरक्षा आणि रोगप्रतिकारकतेवरील अभ्यास अझरबैजानमध्ये फेब्रुवारी 2021 मध्ये सुरू झाला होता. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस आणि रशियाच्या स्पुतनिक लाइट व्हॅक्सीनवर केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, या लसींचे कॉकटेल वापरल्यानंतर लसींचं कोणतेही वाईट किंवा गंभीर परिणाम दिसले नाहीत. इतकंच नाही तर यानंतर कोरोनाचे कोणतेही प्रकरण समोर आलं नाही.

हेही वाचाः मायडा नदीत आढळला मृतदेह

आतापर्यंत 50 स्वयंसेवकांना लसींची कॉकटेल दिली

आरडीआयएफने सांगितलं, आतापर्यंत 50 स्वयंसेवकांना लसींची कॉकटेल देण्यात आली आहे आणि नवीन सहभागींनाही चाचणीमध्ये सामील होण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. डेटाचं अंतरिम विश्लेषण लसीच्या एकत्रित वापरासाठी उच्च सुरक्षा प्रोफाइल दर्शवतं, ज्याचे कोणतेही गंभीर परिणाम झाले नाहीत.

हेही वाचाः काही क्षणात कोसळला डोंगर

‘मिक्स अँड मॅच’

आरडीआयएफ आणि त्याचे भागीदार, अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस आणि स्पुतनिक व्ही लसचे फर्स्ट कंपोनंट वापरुन अझरबैजानमध्ये ऑगस्टमध्ये रोगप्रतिकारकपणाविषयी प्राथमिक डेटा प्रकाशित करतील. आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव यांनी अलीकडील व्हर्च्युअल न्यूज ब्रीफिंगमध्ये सांगितलं, की स्पुतनिक व्ही चे विकसक ‘मिक्स अँड मॅच’ स्वरूपात एस्ट्राझेनेका डोससह लस त्यांची वापरण्याचा विचार करीत आहेत.

हेही वाचाः कोरोना आणि म्युकरमधून बरा झालेल्या सचिन तुभेची गोष्ट

दरम्यान, इतर अनेक देशांमध्येही लसीच्या संयोजनाच्या क्लिनिकल चाचण्या केल्या जात आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्वयंसेवकांचे लसीकरण केलं जात आहे. तर रशिया आणि बेलारूसमध्ये अशा चाचण्या आयोजित करण्यासाठी नियामक मान्यता देण्यात आली आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Congress help flood victims | वाळपईत कॉंग्रेस धावली पुरग्रस्तांच्या मदतीला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!