‘या’ देशात सापडलं तब्बल 99 टन सोनं

99 टन सोन्याची किंमत जीडीपीपेक्षाही जास्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोना काळात सोन्याची किंमत वाढतच चालली आहे. अशातच एक महत्त्वाचा आणि आश्चर्यकारक शोध एका देशात लागलाय. तब्बल ९९ टन सोनं एका देशात आढळून आलं आहे. या सोन्याची किंमत अनेक देशांच्या जीडीपी पेक्षाही जास्त असल्याचं सांगितलं जातंय. कोणत्या देशात नेमका कुणाला लागलाय ९९ टन सोन्याचा शोध, ते सविस्तर जाणून घेऊया.

कुठे मिळालं ९९ टन सोनं?

तुर्कस्तान नावाचा एक देश आहे. या देशात ९९ टन सोनं आढळून आलं आहे. या सोन्याची किंमत ऐकून अनेकांचे डोळे पांढरे होऊ शकतात. ९९ टन सोन्याची किंमत तब्बल ६ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त असल्याचं बोललं जातंय.

सोन्याच्या या मोठ्या खाणीचा शोध तुर्कस्तानाती पॉयराझ या व्यक्तीला लागला. पॉयराझ तुर्कस्तानातील ऍग्रीकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह्सचे प्रमुख आहेत. 99 टन सोन्यापैकी काही हिस्सा दोन वर्षामध्ये काढण्यात यश येईल, असं त्यांनी म्हटलंय. यामुळे तुर्कस्तानाच्या अर्थव्यवस्थेला मोठी आर्थिक मदत होणार आहे. कोरोनामुळे नुकसान झालेल्या अर्थव्यवस्थेला या ९९ टन सोन्यामुळे बळकटी मिळेल, असा विश्वास तुर्कस्तानातील जाणकार व्यक्त करत आहेत.

यंदा 38 टन सोन्याचं उत्पादन

यावर्षी तुर्कस्तानात होणाऱ्या सोन्याच्या उत्पादनाने नवा उच्चांक नोंदवलाय. 2020मध्ये तुर्कस्तानमध्ये 38 टन सोन्याचं उत्पादन करण्यात आलंय.

जीडीपीपेक्षा सोन्याची किंमत

तुर्कस्तानमधील खाणीत सापडलेल्या सोन्याची किंमत 6 अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे. अर्थात अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा ही किंमत जास्त आहे. मालदीवचा जीडीपी 4.87 अब्ज डॉलर आहे. त्यापेक्षा या सोन्याची किंमत जास्त आहे. बुरुंडी, बारबाडोस, गुयाना, मॉन्टेनेगरो, मॉरिशियाना या देशांचा जीडीपीही 6 अब्ज डॉलरपेक्षा खूप कमी आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!