बापरे! कोरोनाची लस दिल्यानंतर 29 जण दगावले! कुठे?

फायझरची लस देण्यात आली होती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ऑस्लो : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नॉर्वेमधून. नॉर्वेमध्ये कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत फायझरचीच लस दिली जाते आहे. मात्र ही लस दिल्यानंतरच काही वेळामध्येच 29 जण दगावले आहेत. त्यामुळे एकच हाहाकार उडालाय. अनेकांना कोरोना लसीची भीती वाटू लागल्याचं बोललं जातंय. महत्त्वाचं म्हणजे लस दिल्यानंतर दगावलेले ते 29 जण वयोवृद्ध होते, अशीही माहिती समोर आली आहे. तर अनेकजणांना दुष्परिणाम दिसून आहेत. काहींची प्रकृती बिघडल्याचंही वृत्त आहे.

लस घेतल्यानंतर काही काळातच दगावलेल्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आहे, याचा शोध सध्या घेतला जातोय. फायझरची लस घेतल्यानंतर ८० वर्षे वयापुढील नागरिकांपैकी काही जणांच्या प्रकृतीवर दुष्परिणाम झाला असूनमृत्यू झालेल्या २३ पैकी १३ जणांना विचित्र लक्षणं आढळून आली आहेत. यामध्ये ताप येणं, अतिसार अशी सिमटम्स दिसून आलेत. एमआरएनए प्रकारची लस घेतल्यानंतर अशी लक्षणे आढळतात, असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केलाय.

सावधगिरी

नॉर्वेत झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर फायझर कंपनीने सावध पवित्रा घेतलाय. युरोपीय देशांना होणारा लसीचा पुरवठा तात्पुरता कमी करण्यात आलाय. सध्या 1.3 अब्ज डोस बनविण्याच्या दृष्टीने काम सुरू होतं, असे नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेने म्हटले आहे. आतापर्यंत नॉर्वेमध्ये 57 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले होते तर पाचशेहून अधिक जणांना कोरोनामुळे बळी गेला होता.

भारतातही लसीकरणाला सुरुवात

दरम्यान इकडे गोवा राज्यासह संपूर्ण भारतात कोरोना लसीकरणाला शनिवारी सुरुवात झाली. भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी एक लाख 91 हजारहून अधिक लोकांना लस देण्यात आली. सगळ्यात आधी सफाई कर्मचारी, डॉक्टर आणि नर्स याना कोरोना लस दिली जात आहे. या सगळ्यांनी कोरोनाच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता काम केलं आहे. केंद्रानं जारी केलेल्या निर्देशांनुसार राज्यातही लसीकरण सुरु आहे.

मोदींनी काय म्हटलंय?

लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार असून जगभरातल्या सुमारे 100 देशांच्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे असे सांगून त्यांनी या मोहिमेच्या अभूतपूर्व व्यापकतेची कल्पना दिली. ही संख्या दुसऱ्या टप्यात 30 कोटी पर्यंत न्यायची असून यामध्ये वयस्कर आणि गंभीर बहु व्याधी असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. 30 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारत, अमेरिका आणि चीन हे तीनच देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच अफवांना बळी न पडण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!