सुदानमध्ये अडकलेत 4000 भारतीय; पंतप्रधान मोदींनी बोलवली उच्चस्तरीय बैठक,परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यावर खिळल्या सर्वांच्या नजरा

सुदानमधील भारतीयांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

सुदानमध्ये गेल्या सात दिवसांपासून हिंसक संघर्ष सुरू आहे. या हिंसाचारात , आतापर्यंत 200 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून 2000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भारतातील अनेक लोक सुदानमध्ये अडकले आहेत. दुसरीकडे, युरोपियन युनियनच्या राजदूतावरही हल्ला झाला आहे. जगभरातील देश आणि संघटनांकडून हा हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले जात आहे, परंतु अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही. सुदानची राजधानी खार्तूममधील हजारो भारतीयांचे जीव धोक्यात आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे.सुदानमध्ये सध्या 4,000 भारतीय अडकले आहेत. सुदानमधील भारतीयांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.

सुदानमध्ये गेल्या सात दिवसांपासून देशाचे सैन्य आणि निमलष्करी गट यांच्यात लढाई सुरू आहे ज्यात सुमारे 200 लोक मरण पावले आहेत. सततच्या गोळीबारामुळे भारतीयांना अन्न, पाणी, औषधे आणि विजेचीही टंचाई जाणवत आहे. सुमारे 5 कोटी लोक वीज, अन्न आणि पाण्यापासून वंचित आहे.दळणवळण व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. सरकार सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सतत संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्री (EAM) एस जयशंकर यांनी सांगितले.

GDXJA

गृहयुद्धाने वेढलेल्या सुदानमधील अनेक शहरांमध्ये लोकांमध्ये अराजकतेचे वातावरण आहे. या युद्धात आतापर्यंत २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर 2500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की मोठ्या संख्येने लोक राजधानी खार्तूम सोडून पळून गेले आहेत.

अल्बर्ट ऑगस्टीन असे मृत व्यक्तीचे नाव असून तो दल ग्रुपसाठी काम करत असे. अज्ञात व्यक्तीने गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. भारत सरकार आणि खार्तूममधील भारतीय दूतावासाने गुरुवारी (20 एप्रिल) भारतीय नागरिकांना सुदानमधील आश्रयाला जाण्याचा सल्ला दिला. अधिका-यांनी सांगितले की, या लोकांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी तत्काळ योजना आखण्यात आल्या आहेत. 

India working closely with US, UK to ensure safety of citizens in Sudan

हिंसाचारग्रस्त सुदानमध्ये भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी यूएस, यूके आणि सौदी अरेबियासह परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर संपर्कात आहे. दरम्यान सुदानमध्ये काम करणाऱ्या एका भारतीयाला 16 तारखेला गोळी लागली होती. त्यात तो जखमी झाला होता. त्याचे निधन झाले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!