कोरोनाचा ठोस आकडा सादर करण्यास चीनची टाळाटाळ का ?

जगात आतापर्यंत ६६ कोटी १७ लाख ११ हजार २२० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत ६६ लाख ८५ हजार ७७५ मृत्यू झाले आहेत.

ऋषभ | प्रतिनिधी

बिजींग : चीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, ते यापुढे कोरोना रुग्णांची माहिती देणार नाहीत. म्हणजेच आता नवीन करोना रुग्ण आणि संसर्गामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी चीनकडून दिली जाणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सरकार लोकांना पारंपरिक चीनी औषध लिआनहुआ किंगवेन घेण्यास सांगत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे औषध विषाणूजन्य संसर्गाच्या आजारपणात दिले जाते. हे औषध खायला देण्याच्या सरकारच्या सूचनेवरून ते करोनाला फ्लू मानत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

पारंपरिक चीनी औषध लिआनहुआ किंगवेन किती असरदार ?

सरकारच्या या सूचनेला लोकांनी विरोध केला आहे. लोक म्हणतात की, सरकार एवढी महागडी औषधे का वितरित करत आहे. आपल्याला फक्त ताप कमी करणाऱ्या औषधांची गरज आहे– ब्रुफिन आणि पॅरासिटामॉल औषध हवे आहे. ही सामान्य औषधे बाजारात का उपलब्ध नाहीत? अलीकडेच, चीन सरकारने वैद्यकीय पुरवठा उत्पादन ताब्यात घेण्याची घोषणा केली. म्हणजेच आता वैद्यकीय उपकरणे आणि औषधांच्या उत्पादनावर सरकार लक्ष ठेवणार आहे.

जगात ६६ कोटींहून अधिक रुग्ण

वर्ल्डोमीटरनुसार, जगात आतापर्यंत ६६ कोटी १७ लाख ११ हजार २२० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ११ जानेवारी २०२० रोजी चीनमधील वुहान येथे एका ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कोविडमुळे जगातील हा पहिला मृत्यू होता. यानंतर मृत्यूची मालिका वाढू लागली. आतापर्यंत ६६ लाख ८५ हजार ७७५ मृत्यू झाले आहेत.

चीन मध्ये संक्रमण काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही

२० ​दिवसांत २५ कोटी लोक संक्रमित

चीनमध्ये करोनाचा भीषण स्फोट झाला आहे. डिसेंबरच्या पहिल्या २० दिवसांतच तब्बल २५ कोटी लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे. सुरुवातीपासून करोनाचा डेटा लपविणाऱ्या चीनचा गुप्त अहवाल लीक झाला आहे. अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने दावा केला आहे की, त्यांनी चीनच्या आरोग्य एजन्सी ‘एनएचसी’ च्या बैठकीतील लीक झालेली कागदपत्रे पाहिली आहेत. जिनपिंग सरकारचा गुप्त डेटा लीक झाल्यानंतर चीनमध्ये खळबळ उडाली आहे.

ही दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात !
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!