अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करोना पॉझिटव्ह

फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनाही करोनाची लागण. राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचाराला मोठा फटका बसण्याची शक्यता.

यश सावर्डेकर | प्रतिनिधी

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donanld Trupm) यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाची लागण झाली आहे. ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली. यामुळे ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे, “मी आणि माझी पत्नी मेलेनिया कोविड पॉझिटिव्ह आढळले आहोत. आम्ही लवकरच क्वारंटाइन प्रक्रियेला सुरुवात करत आहोत. आम्ही यामधून बाहेर पडू”.

याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत आपली सल्लागार होप हिक्सला करोनाची लागण झाली असून आपण क्वारंटाइन होत असल्याची माहिती दिली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!